IND vs ENG : इंग्लंडला आणखी एक धक्का, टी-20 सीरिजमधून हुकमी एक्का आऊट!

भारताविरुद्धची टेस्ट सीरिज गमावल्यानंतर इंग्लंडला (India vs England) आणखी एक धक्का बसला आहे. दुखापतीमुळे त्यांचा महत्त्वाचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) टी-20 सीरिजमधून बाहेर होऊ शकतो.

भारताविरुद्धची टेस्ट सीरिज गमावल्यानंतर इंग्लंडला (India vs England) आणखी एक धक्का बसला आहे. दुखापतीमुळे त्यांचा महत्त्वाचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) टी-20 सीरिजमधून बाहेर होऊ शकतो.

  • Share this:
    अहमदाबाद, 8 मार्च : भारताविरुद्धची टेस्ट सीरिज गमावल्यानंतर इंग्लंडला (India vs England) आणखी एक धक्का बसला आहे. दुखापतीमुळे त्यांचा महत्त्वाचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) टी-20 सीरिजमधून बाहेर होऊ शकतो. कोपराच्या दुखापतीमुळे आर्चर शेवटच्या टेस्टमध्येही खेळला नव्हता. इंग्लंडच्या टीमने टेस्ट सीरिज 3-1 ने गमावली होती. पहिली टेस्ट जिंकल्यानंतर उरलेल्या तिन्ही टेस्टमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पाच मॅचच्या या टी-20 सीरिजला 12 मार्चपासून सुरूवात होणार आहे. सगळ्या मॅच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत भारतात 6 टी-20 मॅच झाल्या आहेत, यापैकी दोन्ही टीमनी 3-3 मॅच जिंकल्या आहेत. दुखापत झाल्यामुळे जोफ्राच्या कोपराला सूज आली होती. इंग्लंड टीमचे डॉक्टर त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत. तो लवकरच फिट होईल आणि भारताविरुद्ध खेळताना दिसेल, असं इंग्लंडचे कोच क्रिस सिल्व्हरवूड म्हणाले होते. आर्चरने रविवारी काही वेळ टीमसोबत सरावही केला. त्याआधी भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही आर्चर खेळला नव्हता. त्यावेळी या दुखापतीचा जुन्या दुखापतीशी काहीही संबध नसल्याचं इंग्लंडने सांगितलं होतं. आर्चरने तिसऱ्या टेस्टमध्ये फक्त 5 ओव्हर बॉलिंग केली होती. तर सीरिजमध्ये त्याने फक्त 35.1 ओव्हर टाकल्या. जगातला सर्वोत्तम टी-20 बॉलर म्हणून आर्चरची गणना होते. पण तो सगळ्या फॉरमॅटमध्ये फिट असावा, अशी आमची अपेक्षा असल्याचं सिल्व्हरवूड म्हणाले. इंग्लंडची टीमही आर्चरला फिट ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल कारण यावर्षी ऑगस्टमध्ये घरच्या मैदानात त्यांना भारताविरुद्ध 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळायची आहे, तसंच ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे, तर यानंतर लगेच ऑस्ट्रेलियात ऍशेसला सुरूवात होईल. आर्चरने त्याच्या 13 टेस्टमध्ये 42 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय त्याला 17 वनडेमध्ये 30 विकेट आणि 7 टी-20 मध्ये त्याने 7 विकेट मिळाल्या आहेत.
    Published by:Shreyas
    First published: