मुंबई, 4 जुलै : भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टनमध्ये सुरू असलेली पाचवी टेस्ट (India vs England 5th Test) मॅच रोमांचक स्थितीमध्ये पोहोचली आहे. भारताने दिलेल्या 378 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या ओपनरनी धमाकेदार सुरूवात केली. जॅक क्राऊली आणि एलेक्स लिस यांनी 9 ओव्हरमध्येच 50 रन केले. नव्या बॉलने मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि कर्णधार जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांची जादूही चालली नाही. एलेक्स लिसने तर टी-20 स्टाईलनेच बॅटिंग केली. रवींद्र जडेजाच्या बॉलिंगवर त्याने रिव्हर्स स्वीप खेळून फोर मारल्या. मोहम्मद सिराजच्या बॉलिंगवर फोर मारत लिसने त्याचं अर्धशतक पूर्ण केलं, यासाठी त्याला फक्त 44 बॉल लागले. जॅक क्राऊली आणि एलेक्स लिस यांच्या जोडीने 20व्या ओव्हरमध्येच 4.93 च्या सरासरीने इंग्लंडचा स्कोअर 100 च्या पुढे नेला. ही पहिल्या विकेटसाठीची इंग्लंडची सगळ्यात जलद पार्टनरशीप होती. तसंच 2008 नंतर चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडची ही सगळ्यात मोठी पार्टनरशीपही ठरली. पण 107 रनच्या स्कोअरवर जसप्रीत बुमराहने क्राऊलीला बोल्ड केलं.
WHAT. A. JAFFA. 🔥#TeamIndia needed something special to break this ominous opening partnership, and Bumrah delivered 🤩
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) July 4, 2022
Tune in to Sony Six (ENG), Sony Ten 3 (HIN) & Sony Ten 4 (TAM/TEL) - (https://t.co/tsfQJW6cGi)#ENGvINDLIVEonSonySportsNetwork #ENGvIND pic.twitter.com/6TCIm8TY62
बुमराहच्या या ओव्हरआधीच बॉल बदलण्यात आला होता. बॉल बदलल्यामुळे भारतीय टीमचं नशीबही बदललं. क्राऊलीला बोल्ड करून बुमराहने टीम इंडियाचं सामन्यात पुनरागमन करून दिलं. बुमराहने टाकलेला इन स्विंग बॉल जॅक क्राऊली सोडायला गेला, पण बॉल थेट स्टम्पवर जाऊनच आदळला. जॅक क्राऊलीची विकेट गेल्यानंतर 21 व्या ओव्हरमध्ये बुमराहने भारताला आणखी एक विकेट मिळवून दिली. ओव्हरच्या पहिल्याच बॉलला ओली पोपचा कॅच विकेट कीपर ऋषभ पंतने पकडला. ओली पोप शून्य रनवर माघारी परतला आणि इंग्लंडने दुसरी विकेटही 107 रनवरच गमावली.

)







