मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : वडील fast bowler, आई volleyball player, आता मुलाची टीम इंडियामध्ये एण्ट्री!

IND vs ENG : वडील fast bowler, आई volleyball player, आता मुलाची टीम इंडियामध्ये एण्ट्री!

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs England) 66 रननी दणदणीत विजय झाला. कृणाल पांड्या (Krunal Pandya) याने या मॅचमधून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तर प्रसिद्ध कृष्णाची (Prasidh Krishna) ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच होती.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

पुणे, 26 मार्च : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा (India vs England) 66 रननी दणदणीत विजय झाला. कृणाल पांड्या (Krunal Pandya) याने या मॅचमधून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, तर प्रसिद्ध कृष्णाची (Prasidh Krishna) ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच होती. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये कृणाल पांड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी धमाकेदार कामगिरी केली. कृणालने या मॅचमध्ये अर्धशतकी खेळी केली, तर प्रसिद्धने 4 विकेट घेतल्या. सोबतच दोघांच्या नावावार विक्रमाचीही नोंद झाली. पदार्पणाच्या सामन्यात सगळ्यात जलद अर्धशतक करण्याचा रेकॉर्ड कृणालच्या नावावर झाला, तसंच पहिल्याच वनडेमध्ये एवढ्या विकेट घेणारा प्रसिद्ध कृष्णा पहिला भारतीय खेळाडू ठरला.

कर्नाटकचा असलेल्या प्रसिद्ध कृष्णाला लहानपणी कोणत्या खेळात करियर घडवायचं, हा प्रश्न सतावत होता. प्रसिद्धचे वडील मुरली कृष्णा (Murali Krishna) फास्ट बॉलर होते. कॉलेज क्रिकेटमध्ये मुरली कृष्णा खेळले होते, तर त्याची आई कलावती (Kalavati) राज्य स्तरावर व्हॉलीबॉल खेळाडू होती, त्यामुळे क्रिकेटमध्ये करियर करायचं का व्हॉलीबॉलमध्ये याबाबत प्रसिद्ध वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत संभ्रमात होता.

कर्नाटकचे माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू श्रीनिवास मूर्ती यांनी कृष्णाला आपल्या वडिलांप्रमाणे फास्ट बॉलर बनण्याचा सल्ला दिला. बंगळुरूच्या कारमेल शाळेत शिकणाऱ्या प्रसिद्धने हा सल्ला ऐकला आणि क्रिकेटमध्ये करियर करायला सुरूवात केली. क्रिकेट खेळताना प्रसिद्धला त्याच्या उंचीचाही फायदा झाला.

मुरली कृष्णा यांना कॉलेजनंतर क्रिकेट खेळता आलं नाही, पण त्यांनी मुलाचं स्वप्न पूर्ण करायला मदत केली. मुरली कृष्णा यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. 'प्रसिद्धची उंची जास्त होती, तो जेव्हा 15 वर्षांचा होता तेव्हा जलद बॉलिंग करायचा,' असं त्याच्या वडिलांनी सांगितलं.

प्रसिद्ध कृष्णाने 2015-16 साली कर्नाटककडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. दोन वर्षानंतर तो चेन्नईच्या एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये गेला. तिकडे त्याने फिटनेसवर काम करून स्वत:ला टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी लायक बनवलं. यानंतर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना प्रसिद्धला ओळख मिळाली. आयपीएलमध्ये त्याने 24 मॅच खेळून 18 विकेट घेतल्या आहेत.

First published:

Tags: Cricket news, IND Vs ENG, Krunal Pandya, Sports