मुंबई, 30 मार्च : आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. 9 एप्रिलपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे, पण त्याआधी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारत आणि इंग्लंड सीरिजमध्ये (India vs England) कॉमेंट्री करणाऱ्या इरफान पठाणला (Irfan Pathan) कोरोनाची लागण झाली आहे. रायपूरमध्ये झालेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये (Road Safety World Series) इरफान पठाण खेळला होता. या सीरिजमधल्या सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), युसूफ पठाण (Yusuf Pathan) आणि सुब्रमण्यम बद्रीनाथ (Subramaniam Badrinath) यांनाही कोरोना झाला आहे.
— Irfan Pathan (@IrfanPathan) March 29, 2021
स्टार स्पोर्ट्सवर इरफानची कॉमेंट्री
भारत-इंग्लंड सीरिजमध्ये स्टार स्पोर्ट्सवर इरफानने मॅच आधीचे आणि मॅचनंतरचे शो केले. त्यावेळी इरफानच्या संपर्कात व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) तसंच बुमराहची (Jasprit Bumrah) बायको आणि स्टार स्पोर्ट्सची एँकर संजना गणेशन (Sanjana Ganesan) याच्या संपर्कात आला. व्हीव्हीएस लक्ष्मण हा आयपीएलच्या सनरायजर्स हैदराबादचा (SRH) मेंटर आहे. तसंच इरफानने पार्थिव पटेलसोबतही स्टार स्पोर्ट्सवर एक शो केला. पार्थिव पटेल हा मुंबई इंडियन्सचा टॅलेंट स्काऊट आहे. यातला व्हीव्हीएस लक्ष्मण चेन्नईमध्ये दाखल झाल्याचा फोटो सनरायजर्स हैदराबादने पोस्ट केला आहे.
View this post on Instagram
स्टार स्पोर्ट्सवर शो करत असताना इरफान पठाण अजून कोणाच्या संपर्कात आला, आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणाऱ्यांचा यात समावेश आहे का? याबाबत अजून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पण इरफान जर यांच्या व्यतिरिक्त कोणाच्या संपर्कात आला असेल तर आयपीएलवरचं संकट वाढण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Cricket news, India vs england, IPL 2021, Jasprit bumrah, ROAD SAFETY CAMPAIGN, Sanjana ganesan