नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : भारत-बांगलादेश यांच्यातील टी-20 आणि कसोटी मालिकेतील विघ्न संपता संपत नाही आहेत. या दौऱ्याआधीच बांगलादेश संघातील खेळाडूंनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आता खेळाडूंनी या दौऱ्यातून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं बांगलादेश दौऱ्यात कोणते खेळाडू खेळणार हे पाहावे लागणार आहे. बांगलादेश आणि भारत यांच्यात 3 नोव्हेंबरपासून 3 टी-20 आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. यासाठी बांगलादेशचा संघ 30 ऑक्टोबरला भारतात दाखल होणार आहे. मात्र या दौऱ्याआधी बांगलादेश संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. संघात सामिल होण्यासाठी खेळाडूच उरले नसल्याचे मत बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी व्यक्त केले. दरम्यान आता अनेक खेळाडू या दौऱ्यातून माघार घेऊ शकतात. याआधी तमीम इक्बालनं या दौऱ्यातून माघार घेतली होती. भारत दौरा न होण्यासाठी काही लोकांचे प्रयत्न बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी, “तुम्हाला भारत दौऱ्याबाबत अजून विशेष काही माहिती नाही आहे. थांबा काही काळ आणि मग पाहा. माझ्याकडे अशी माहिती आहे की काही लोक भारत दौऱ्यात नुकसान व्हावे यासाठी प्रयत्न करत आहेत. बांगलादेशचा कर्णधार शाकिब-अल-हसनही या दौऱ्यातून माघार घेण्याची शक्यता आहे. त्यामुळं जर कर्णधारच नसेल तर आयत्यावेळी कोणाला कर्णधार करणार असा सवालही नजमुल यांनी विचारला. दौऱ्यावर प्रदुषणाचे सावट दिल्लीमधील वायू गुणवत्ता खराब असल्यामुळं भारत-बांगलादेश यांच्यातील सामना अडचणीत आला आहे. दिवाळीच्या आधी आणि नंतर एक्यआईच्या (air quality index) आकड्यांनुसार 0-50 खुप चांगली, 51-100 चांगली, 101-200 मध्यम, 201-300 खराब, 300-400 खुप खराब आणि 400च्या वर गंभीर अशी विभागणी करण्यात आली आहे. यानुसार दिल्लीमधली हवा सध्या 357 म्हणजेच खुप खराब आहे.बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत, “दिवाळीनंतर पुन्हा एकदा आकड्यांची पाहणी केली जाईल. दरम्यान दिवाळीनंतर आठवड्याच्या कालावधीनंतर सामना होणार असल्यामुळं खेळाडूंच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. बांगलादेश विरोधात पहिला टी-20 सामना - 3 नोव्हेंबर (दिल्ली), दुसरा टी20 सामना- 7 नोव्हेंबर (राजकोट), तिसरा टी20 सामना- 10 नोव्हेंबर (नागपुर) येथे होणार. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं दिल्लीमध्ये होणार सामना दुसऱ्या ठिकाणी आयोजित केला जाऊ शकतो. अशी आहे टी- मालिका पहिला टी-20 सामना - 3 नोव्हेंबर (दिल्ली) दुसरा टी20 सामना- 7 नोव्हेंबर (राजकोट) तिसरा टी20 सामना- 10 नोव्हेंबर (नागपुर) असा आहे भारताचा टी-20 संघ- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युजवेंद्र चहल, दीपक चाहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकुर. असा आहे बांगलादेशचा संघ- शाकिब-अल-हसन (कर्णधार), तमीम इकबाल, लिटन दास, सौम्य सरकार, नईम शेख, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ हुसैन, मोसादिक हुसैन, अमिनुल इस्लाम, अराफात सनी, मोहम्मद सैफउद्दीन, अल अमीन हुसैन, मुस्तफिजुर रहमान, सफीउल इस्लाम.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







