जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / WTC फायनल ड्रॉ झाली तर विजेता कोण? काय आहे नियम

WTC फायनल ड्रॉ झाली तर विजेता कोण? काय आहे नियम

WTC फायनल ड्रॉ झाली तर विजेता कोण? काय आहे नियम

WTC फायनलसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जून ते 11 जूनपर्यंत हा सामना होणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

दिल्ली, 04 जून : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणार आहे. WTC फायनलसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 7 जून ते 11 जूनपर्यंत हा सामना होणार आहे. डब्ल्यूटीसी फायनल ड्रॉ झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद जाहीर केले जाईल. इंग्लंडमध्ये ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. या पाच दिवसांच्या काळात हवामान विभागाने पावसाची शक्यता नसल्याचं म्हटलं आहे. या महत्त्वाच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणू नये अशी चाहत्यांची इच्छा आहे. सुरुवातीच्या चार दिवसात तरी पावसाचे ढग नाहीत. तरीही काही कारणाने सामन्याचा खेळ वाया गेल्यास त्यासाठी राखीव दिवसाची तरतूद आहे. माहीचा जबरा फॅन; लग्नपत्रिकेत छापला एम. एस धोनीचा फोटो आणि जर्सी नंबर, Photo Viral   दररोज सहा तासांचा खेळ खेळला जाईल. काही कारणांनी पाच दिवसांत एकूण 30 तासांचा खेळ झाला नाही तर राखीव दिवसाचा वापर केला जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच ओव्हलवर आमने सामने येतील. याआधीही दोन्ही संघांचा सामना या मैदानावर झालेला नाही. पण इंग्लंडविरुद्ध इथं दोन्ही संघ खेळले आहेत. भारतीय संघाने ओव्हलवर आतापर्यंत 14 कसोटी सामने खेळले असून फक्त दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाच सामने गमावले आहेत. सात कसोटी सामने ड्रॉ राहिले आहेत. ऑस्ट्रेलियाने या मैदानावर 38 कसोटी खेळल्या असून 7 सामने जिंकले तर 17 सामन्यात पराभव पत्करला असून 14 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने या मैदानात अखेरचा विजय 2021 मध्ये मिळवला होता. तेव्हा कर्णधार विराट कोहली होता. याआधी भारताने 1971 मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली पहिला कसोटी सामना जिंकला होता. तेव्हा इंग्लंडकडून भारताला पराभव पत्करावा लागला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात