सिडनी, 9 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या बॉलरनी भारताला धक्के दिले. दिवसाच्या पहिल्याच सत्रामध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि हनुमा विहारी माघारी परतले. मागच्या टेस्टमध्ये शतक करणारा कर्णधार अजिंक्य रहाणे या मॅचमध्ये 22 रन करून माघारी परतला. पॅट कमिन्स (Pat Cummins) ने टाकलेल्या भन्नाट बॉलवर रहाणे क्लीन बोल्ड झाला.
पॅट कमिन्सने टाकलेला बॉल रहाणेने थर्ड मॅनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, पण हे करत असताना रहाणेचा अंदाज चुकला आणि स्टम्प उडाला. त्याआधी पॅट कमिन्सने दुसऱ्या दिवशी शुभमन गिल यालाही अर्धशतक केल्यानंतर आऊट केलं होतं. तसंच कमिन्सने चेतेश्वर पुजारा याचीही अर्धशतक केल्यानंतर विकेट घेतली.
Pressure, pressure, pressure! Cummins ends Rahane's resistance! #OhWhatAFeeling@Toyota_Aus | #AUSvIND pic.twitter.com/LEsF5a70IE
— cricket.com.au (@cricketcomau) January 8, 2021
मॅचच्या दुसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) याच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 338 रन केले. स्मिथचं टेस्ट क्रिकेटमधलं हे 27 वे तर भारताविरुद्ध 8वं टेस्ट शतक आहे. लाबुशेन याने 91 रनची आणि आपली पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या विल पुकोवस्कीने 62 रनची खेळी केली. भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर जसप्रीत बुमराह-नवदीप सैनी यांना प्रत्येकी 2-2 तर मोहम्मद सिराजला एक विकेट मिळाली. 131 रनची खेळी करून स्टीव्ह स्मिथ रन आऊट झाला.
ऍडलेडमधली पहिली टेस्ट गमावल्यानंतर भारताने मेलबर्नमध्ये जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला. 4 टेस्ट मॅचची ही सीरिज सध्या 1-1 ने बरोबरीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.