मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्याची खराब सुरुवात, पहिल्या वनडेमध्ये भारताचा पराभव

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्याची खराब सुरुवात, पहिल्या वनडेमध्ये भारताचा पराभव

टीम इंडिया (India vs Australia) च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात खराब झाली. पहिल्याच वनडेमध्ये भारताचा 66 रनने पराभव झाला आहे.

टीम इंडिया (India vs Australia) च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात खराब झाली. पहिल्याच वनडेमध्ये भारताचा 66 रनने पराभव झाला आहे.

टीम इंडिया (India vs Australia) च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात खराब झाली. पहिल्याच वनडेमध्ये भारताचा 66 रनने पराभव झाला आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

सिडनी, 27 नोव्हेंबर :  टीम इंडिया (India vs Australia) च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात खराब झाली. पहिल्याच वनडेमध्ये भारताचा 66 रनने पराभव झाला आहे. ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 374 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 50 ओव्हरमध्ये 308/8 एवढाच स्कोअर करता आला. हार्दिक पांड्याने सर्वाधिक 90 रनची खेळी केली, तर शिखर धवन 74 रन करून माघारी गेला. मयंक अग्रवाल (22 रन), विराट कोहली (21 रन) आणि रवींद्र जडेजा (25 रन) यांना चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. नवदीप सैनी 29 रनवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून एडम झम्पाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर जॉस हेजलवूडला 3 आणि मिचेल स्टार्कला एक विकेट मिळाली.

त्याआधी ऑस्ट्रेलियाने केलेल्या धडाकेबाज बॅटिंगमुळे पहिल्या वनडेमध्ये भारताला मोठं आव्हान मिळालं. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 374 रनपर्यंत मजल मारली. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर ओपनर एरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सुरुवातीपासूनच आक्रमण करायला सुरुवात केली. वॉर्नर आणि फिंच यांच्यामध्ये 27.5 ओव्हरमध्ये 156 रनची पार्टनरशीप झाली. डेव्हिड वॉर्नर 69 रन करून माघारी परतला, तर फिंचने 124 बॉलमध्ये 114 रन केले. स्मिथ याने 66 बॉलमध्ये 105 रनची खेळी केली. तर संपूर्ण आयपीएलमध्ये फॉर्मसाठी झगडणाऱ्या मॅक्सवेलने 19 बॉलमध्ये 45 रन ठोकले.

भारताकडून मोहम्मद शमीला 3 तर जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

तब्बल नऊ महिन्यानंतर भारतीय टीम आज पहिल्यांदाच मैदानात उतरली. कोरोना व्हायरसमुळे दोन्ही टीमनी बायोबबलमध्ये सराव केला. या दौऱ्याला सुरुवात होण्याआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला. इशांत शर्मा आणि रोहित शर्मा फिटनेसमुळे टी-20 आणि एकदिवसीय मालिकेतून बाहेर गेले आहेत. त्यामुळे संघांचा फिटनेस महत्त्वाचा असणार आहे.

आयपीएलमध्ये कर्णधार विराट कोहलीला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पुन्हा आपल्या फॉर्ममध्ये येण्यासाठी विराटकडे मोठी संधी असेल. तर या दौऱ्यात केएल राहुलकडे संघाचे उप-कर्णधारपद देण्यात आले आहे. त्यामुळे केएल राहुलकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. तर गोलंदाजीमध्ये इशांत शर्मा दौऱ्याबाहेर पडल्यामुळे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यावर संघाची मदार असेल.

टी नटराजनची संघात निवड

टॉसच्या काही तास आधी भारतीय संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयनं भारतीय संघात टी. नटराजनला (T Natrajan) सामिल केले आहे. नटराजनला नवदीप सैनीचा (Navdeep Saini) रिझर्व्ह खेळाडू म्हणून संघात घेतले आहेत. आयपीएल (IPL 2020) च्या या मोसमात नटराजन याने त्याच्या यॉर्करने दिग्गज बॅट्समनची भंबेरी उडवली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची निवड झाली. टी नटराजनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळणार नसली तरी, त्याच्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवणं ही मोठी बाब असेल.

भारतीय संघ-

शिखर धवन, मयंक अग्रवाल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी

ऑस्ट्रेलियाचा संघ-

अॅरॉन फिंच, स्टिव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनस, मार्नेस लबुशने, ग्लेन मॅक्सवेल, अॅलेक्स कॅरी, प‌ॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, अॅडम झुम्पा, जोश हेजलवूड, डेव्हिड वॉर्नर.

First published:

Tags: India vs Australia