ब्रिस्बेन, 15 जानेवारी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमधून टी. नटराजन (T Natrajan) याने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. याचसोबत एकाच दौऱ्यात क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा नटराजन भारताचा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्यामुळे नटराजनला खेळण्याची संधी मिळाली.
नटराजनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 2 डिसेंबरला कॅनबेराच्या दुसऱ्या वनडेमधून पदार्पण केलं. भारताने ही मॅच 13 रनने जिंकली. नटराजनने 10 ओव्हरमध्ये 70 रन देऊन 2 विकेट घेतल्या. यानंतर तीन टी-20 मॅचमध्ये नटराजनने 6 विकेट घेतल्या. भारताने ही सीरिज 2-1 ने जिंकली होती.
नटराजनने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर आयसीसीनेही त्याला शुभेच्छा देणारं ट्विट केलं आहे. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये एकाच दौऱ्यात पदार्पण करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला, असं ट्विट आयसीसीने केलं आहे.
Welcome to Test cricket, @Natarajan_91 Thangarasu Natarajan becomes the first Indian player to make his International debut across all three formats during the same tour #AUSvIND pic.twitter.com/CKltP2uT5w
— ICC (@ICC) January 14, 2021
नटराजन टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा पहिला खेळाडू आहे ज्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये लागोपाठ 10 इनिंगमध्ये एकही रन केलेली नाही.
नटराजनच्या मागच्या 10 प्रथम श्रेणी इनिंग : 0, 0*, 0*, 0, 0, 0, 0*, 0*, 0*, 0
मार्क रॉबिनसन यांचं वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्यापासून नटराजन तीन इनिंग लांब आहे. 1990 साली 12 इनिंगमध्ये एकही रन केली नव्हती. तामीळनाडूच्या नटरजानने आयपीएलमध्ये 16 मॅच खेळून 8.02 च्या इकोनॉमी रेटने 16 विकेट घेतल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.