IND vs AUS : ऑस्ट्रेलियाहून परतल्यावर थेट वडिलांच्या कबरीजवळ, सिराजला अश्रू अनावर

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाहून परतल्यावर थेट वडिलांच्या कबरीजवळ, सिराजला अश्रू अनावर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये ऐतिहासिक कामगिरी करणारी टीम इंडिया (India vs Australia) भारतात परतली आहे. भारताच्या या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) होता.

  • Share this:

हैदराबाद, 21 जानेवारी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये ऐतिहासिक कामगिरी करणारी टीम इंडिया (India vs Australia) भारतात परतली आहे. ब्रिस्बेनमध्ये झालेल्या रोमांचक टेस्टमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, याचसोबत बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताच्या या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) होता. ब्रिस्बेन टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये सिराजने 5 विकेट घेतल्या.

ऑस्ट्रेलियातून भारतात परतल्यानंतर मोहम्मद सिराज विमानतळावरून थेट हैदराबादमध्ये वडिलांच्या कबरीजवळ गेला आणि भावुक झाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असतानाच मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन झालं होतं. यानंतर त्याला बीसीसीआयने भारतात परत जाण्याबाबत विचारलं होतं, पण सिराजची आई आणि विराट कोहली यांनी त्याला ऑस्ट्रेलियातच थांबून वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा आग्रह केला. यानंतर सिराज ऑस्ट्रेलियामध्ये थांबला आणि त्याने इतिहास घडवला.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट मॅचआधी राष्ट्रगीतादरम्यानही मोहम्मद सिराजला वडिलांच्या आठवणीमुळे अश्रू अनावर झाले होते. ब्रिस्बेन टेस्टमध्ये 5 विकेट घेतल्यानंतरही सिराज वडिलांच्या आठवणींमुळे भावुक झाला होता. माझी कामगिरी बघण्यासाठी आज वडील हवे होते. मला भारतासाठी टेस्ट मॅच खेळताना बघण्याचं त्यांचं स्वप्न होतं, असं सिराजने सांगितलं.

अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये मोहम्मद सिराजच्या वडिलांनी त्याला मोठं केलं होतं. हैदराबादमध्ये रिक्षा चालवून वडिलांनी सिराजची क्रिकेट खेळण्याची इच्छा पूर्ण केली. आपल्या तुटपुंज्या कमाईमधून त्यांनी सिराजला क्रिकेट खेळण्यासाठी लागणारे बूटही आणून दिले. आयपीएलदरम्यानही मोहम्मद सिराजच्या वडिलांची तब्येत खराब होती. वडिलांच्या प्रकृतीसाठी प्राथर्ना करण्याचं आवाहन सिराजने त्यावेळी केलं होतं.

Published by: Shreyas
First published: January 21, 2021, 4:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या