Home /News /sport /

India vs Australia : डोक्याला चेंडू लागून क्रिकेटपटूचा मृत्यू, 63 सेकंद मौन बाळगणार भारत-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू

India vs Australia : डोक्याला चेंडू लागून क्रिकेटपटूचा मृत्यू, 63 सेकंद मौन बाळगणार भारत-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू

या क्रिकेटपटूला श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या होणाऱ्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ 63 सेकंद मौन बाळगणार आहे.

    सिडनी, 26 नोव्हेंबर : भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात 27 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी (Indian Cricket team) खास असणार आहे, कारण कोरोना काळात पहिल्यांदाच विराटसेना मैदानात उतरणार आहे. तर ऑस्ट्रेलिया संघाचा ही पहिली घरेलू मालिका असणार आहे. मात्र, सिडनीमध्ये होणारा हा पहिला एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलिया संघाला भावूक करणारा असेल, कारण याच दिवशी 2014मध्ये ऑस्ट्रेलियाच्या प्रतिभावान खेळाडूचे निधन झाले होते. ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू फिलिप ह्यूजचा (Phillip Hughes) डोक्याला चेंडू लागून 27 नोव्हेंबर 2014 रोजी मृत्यू झाला होता. 25 नोव्हेंबर रोजी झालेल्या एका सामन्यात डोक्याला चेंडू लागून लाइव्ह सामन्यातच फिलिप बेशुद्ध पडला होता. त्यानंतर दोन दिवसांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे 24 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ फिल ह्यूजला श्रद्धांजली वाहणार आहे. वाचा-IND vs AUS : आईने मजुरी करून वाढवलं, आता मिळाली टीम इंडियाची जर्सी, खेळाडू भावुक मीडिया रिपोर्टनुसार पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी फिलिप ह्यूजला दोन्ही संघ श्रद्धांजली वाहतील. दोन्ही संघांचे खेळाडू ह्यूजच्या स्मरणार्थ 63 सेकंद मौन बाळगतील. फिलिप ह्यूजनं आपल्या अखेरच्या सामन्यात 63 धावांची खेळी केली होती. सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू काळ्या फिती बांधून मैदानात उतरतील. वाचा-IND vs AUS : वनडे सीरिजआधी ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय भारताला फायद्याचा ठरणार! फिलिप ह्यूजची कारकीर्द फिलिप ह्यूजनं ऑस्ट्रेलियाकडून 26 कसोटी आणि 25 एकदिवसीय सामने खेळले. त्याने एक टी -20 आंतरराष्ट्रीय सामनाही खेळला आहे. कसोटीत ह्यूजच्या नावावर 3 शतकं आणि 7 अर्धशतकांची नोंद आहेत. त्यानं 1535 धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात त्यानं 24 डावांमध्ये 2 शतकं आणि 4 अर्धशतकांची खेळी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 826 धावा आहेत. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी फिलिपचे निधन झाले.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket, India vs Australia

    पुढील बातम्या