Home /News /sport /

India Open: लक्ष्य सेनचा वर्ल्ड चॅम्पियनला दणका; पहिल्यांदाच जिंकलं इंडिया ओपनचं जेतेपद

India Open: लक्ष्य सेनचा वर्ल्ड चॅम्पियनला दणका; पहिल्यांदाच जिंकलं इंडिया ओपनचं जेतेपद

India open: डच ओपनच्या फायनलमधून धडा घेत यावेळी लक्ष्यने फारशी चूक केली नाही आणि जबरदस्त खेळ दाखवत विजेतेपद पटकावले. सेन याच्या कारकिर्दीतील हे सर्वात मोठे जेतेपद आहे. त्याने 2019 मध्ये डच ओपन आणि सारलोरलक्स ओपन अशी दोन सुपर 100 विजेतेपदे जिंकली आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 16 जानेवारी : भारताच्या लक्ष्य सेनने (Lakshya Sen) पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत विद्यमान विश्वविजेत्या सिंगापूरच्या लोह लीन य्यूचा (Loh Lean Yew) पराभव केला. यासह त्याने इंडिया ओपन (India open) बॅडमिंटनचे विजेतेपद पटकावले. या 20 वर्षीय भारतीय खेळाडूचे सुपर-500 स्तरावरील स्पर्धेतील हे पहिलेच विजेतेपद आहे. तत्पूर्वी, सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरी जोडीनं तीन वेळा विश्वविजेत्या मोहम्मद अहसान आणि इंडोनेशियाच्या हेंद्रा सेटियावान यांच्यावर सरळ गेममध्ये शानदार विजय नोंदवून इंडिया ओपन जिंकणारी पहिली जोडी ठरली. गेल्या महिन्यात स्पेनमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या सेनने आज (रविवार) 54 मिनिटे चाललेल्या अंतिम फेरीत पाचव्या मानांकित शटलरचा 24-22, 21-17 असा पराभव केला. त्याचबरोबर जागतिक क्रमवारीत 10व्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीने दमदार खेळ आणि उत्साह दाखवत अव्वल मानांकित इंडोनेशियाच्या जोडीचा 43 मिनिटांत 21-16, 26-24 असा पराभव करून नवीन हंगामाची शानदार सुरुवात केली. सेन आणि लोह यांच्यातील या सामन्यापूर्वी झालेल्या चार सामन्यांत लक्ष्यने दोन सामने जिंकले होते. गेल्या वर्षी डच ओपनच्या अंतिम फेरीत लोहने बाजी मारली होती. कारकिर्दीतील सर्वात मोठे जेतेपद पटकावले डच ओपनच्या फायनलमधून धडा घेत यावेळी लक्ष्यने फारशी चूक केली नाही आणि जबरदस्त खेळ दाखवत विजेतेपद पटकावले. सेन याच्या कारकिर्दीतील हे सर्वात मोठे जेतेपद आहे. त्याने 2019 मध्ये डच ओपन आणि सारलोरलक्स ओपन अशी दोन सुपर 100 विजेतेपदे जिंकली आहेत. त्याच वर्षी त्याने बेल्जियम, स्कॉटलंड आणि बांगलादेशमध्ये तीन आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे. यानंतर कोविड-19 च्या प्रादुर्भावाने त्याच्या कामगिरीला ब्रेक लागला. हे वाचा - IND vs SA : DRS चा वाद, विराटची स्टम्प माईकवर टीका, आता SuperSport ने दिलं प्रत्युत्तर कॉमनवेल्थ गेम्ससाठी महत्त्वाचे मुद्दे या सामन्यापूर्वी सात्विक आणि चिराग यांना इंडोनेशियन जोडीविरुद्ध चार सामन्यांत केवळ एकच विजय नोंदवता आला होता. कोविड-19 चाचणीत चुकीच्या पॉझिटिव्ह निकालामुळे स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या धोक्याचा सामना केल्यानंतर, या जोडीने विजेतेपद जिंकून मजबूत मानसिकता दाखवली आहे. नव्या हंगामापूर्वी महत्त्वाचे रँकिंग गुण मिळवू शकले. राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई खेळांसारख्या स्पर्धांसाठी पात्र ठरण्यासाठी हे रँकिंग गुण महत्त्वाचे ठरतील. 2019 मध्ये थायलंड ओपनमध्ये विजय मिळवून या दोघांनी फ्रेंच ओपन सुपर 750 (2019) ची अंतिम फेरी गाठली. हे वाचा - पाकिस्तानच नव्हे तर आम्हीही करू शकतो अशी ‘कामगिरी’; ॲशेस सामन्यात इंग्लंडने दाखवून दिलं दोघांनी 2018 मध्ये हैदराबाद ओपन सुपर 100 स्पर्धा जिंकली होती. सय्यद मोदी इंटरनॅशनलमध्ये उपविजेता राहण्याव्यतिरिक्त, या जोडीने गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. भारतीय जोडी गेल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरली होती, परंतु तीनपैकी दोन सामने जिंकूनही त्यांना ग्रुप कॉव्लिफाय करता आला नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Badminton, Sports

    पुढील बातम्या