S M L

स्मृतीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने विंडीजला नमवलं

स्मृती मंधानाने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने महिलांच्या वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजवर सात विकेट्सनी सहज मात केली

Sonali Deshpande | Updated On: Jun 30, 2017 01:53 PM IST

स्मृतीच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने विंडीजला नमवलं

30 जून : पूनम यादव, दीप्ती शर्मा आणि हरमनप्रीत कौर या फिरकी गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर स्मृती मंधानाने केलेल्या शतकाच्या जोरावर भारताने महिलांच्या वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजवर सात विकेट्सनी सहज मात केली. भारताने विंडीजला ८ बाद १८३ धावांत रोखलं. यानंतर विजयी लक्ष्य ४२.३ षटकांत तीन विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. इंग्लंड पाठोपाठ विंडीजला नमवून भारतीय महिलांनी सलग दुसरा विजय नोंदवला.

या विजयाचं श्रेय जिला जातं ती वादळी शतक ठोकणारी स्मृती मंधाना  सांगलीची आहे . एवढंच नाही तर स्मृती फक्त 20 वर्षांची आहे. तिचा जन्म 18जुलै 1996ला मुंबईत झाला. तिच्या भावाला पाहत ती क्रिकेट खेळायला शिकली . अवघ्या 9व्या वर्षी तिचं महाराष्ट्राच्या अंडर 15 क्रिकेट टीममध्ये सिलेक्शन  झालं. आणि तिच्या जोरदार फटाकेबाजीच्या जोरावर तेरा वर्षात तिचं   भारताच्या विश्वचषकाच्या टीममध्ये सिलेक्शन झालं. वनडेमध्ये द्विशतक ठोकणारी ती एकमेव महिला क्रिकेटर आहे. तिची विजय घोडदौड अशीच चालू राहिली तर लवकरच ती महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर ठरू शकते .

भारताची पुढची   लढत आता २ जुलैला पाकिस्तानविरुद्ध  होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2017 01:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close