भारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली

भारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली

वेस्ट इंडिजनं दिलेलं 72 धावांचं आव्हान भारताने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं.

  • Share this:

हैद्राबाद, 14 ऑक्टोबर : दुसऱ्या कसोटीत भारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने धूळ चारली आहे. या विजयासह भारताने दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खिशात घातली. वेस्ट इंडिजनं दिलेलं 72 धावांचं आव्हान भारताने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं.

सलामीवीर पृथ्वी शॉने आणि केएल राहुल या दोघांनीही प्रत्येकी 33 धावांची नाबाद खेळी केली. संपूर्ण सामन्यामध्ये भारत सर्वच क्षेत्रांत वेस्ट इंडिजच्या संघाला वरचढ ठरला.

वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 311 धावा केल्या. त्याच्या प्रत्युत्तरात भारताने आपल्या पहिल्या डावात 367 धावा करत 56 धावांची आघाडी मिळवली. तर दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या 127 धावाच करू शकला. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी भारतासमोर 72 धावांचं सोपं लक्ष्य होते.

विदर्भ एक्सप्रेसची कमाल

उमेश यादवने दुसऱ्या कसोटी सामन्यात 10 विकेट्स मिळवत आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. पहिल्या डावात 6 तर दुसऱ्या डावात 4 फलंदाजांना बाद केलं.  

युवा फलंदाजांचा धमाका

युवा पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंत यांनीही या सामन्यात दमदार फलंदाजी केली. या दोघांनाही शतक पूर्ण करण्यात अपयश आलं असलं तरीही पृथ्वी आणि पंतने पहिल्या डावात दमदार अर्धशतकं ठोकली.

 

First Published: Oct 14, 2018 05:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading