ढाका, 23 जुलै : भारतीय महिला क्रिकेट संघ नुकताच बांगलादेश दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळला. ही मालिका रोमहर्षक आणि वादग्रस्तही ठरली. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यानंतर दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत होते. तर तिसरा सामना टाय झाला. यामुळे ही मालिकासुद्धा बरोबरीत राहिली. तिसऱ्या सामन्यात मात्र मोठा वाद झाला. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पायचित दिल्याने वाद निर्माण झाला होता. यावेळी रागात हरमनने स्टम्पवर बॅट मारली आणि पंचांशी वाद घातला. आता तिला या प्रकरणी दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. एका सामना अधिकाऱ्याने सांगितलं की, हरमनप्रीतवर सामन्याच्या ७५ टक्के इतक्या मानधनाचा दंड होऊ शकतो. हा नियम फक्त लेवल दोन च्या उल्लंघनासाठी आहे. मैदानावर जी घटना घडली त्यासाठी हरमनप्रीतवर ५० टक्क्यांपर्यंत दंड होईल. तर सामन्यानंतर प्रेजेंटेशनवेळी हरमनने जे काही आरोप पंचांवर केले त्यासाठी तिच्यावर २५ टक्के दंड लावला जाईल. हरमन प्रीतला ३ डीमेरिट पॉइंटही मिळू शकतात. यात दोन पॉइंट तिच्या मैदानावरील वर्तनाला तर एक पॉइंट सामन्यानंतर पंचांवर केलेल्या आरोपासाठी असतील. 13 वर्षात 3 विकेट, वेस्ट इंडिजमध्ये खातंही उघडलं नाही; पुन्हा संधी मिळणं अवघड तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना २२५ धावा केल्या होत्या. यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा सुरुवात अडखळत झाली. त्यानंतर डाव सावरला असतानाच ३४ व्या षटकात हरमनप्रीत बाद झाली. नाहिदा अख्तरच्या चेंडूवर स्वीप शॉट मारण्याच्या प्रयत्नात चेंडू पॅडवर आदळला. यावर पंचांनी तिला पायचित बाद दिलं.
IND-W captain Harmanpreet hit the stumps, shouts at the umpire then showed middle finger & thumb to the fans after given LBW by the umpire, claiming it was bat.
— Saqlain (@SaqlainHameeed) July 22, 2023
She Also Complaint about Umpiring In Press Conference #HarmanpreetKaur #INDWvsBANW pic.twitter.com/4HY8nWff8x
हरमनप्रीत यावेळी चेंडू बॅटला लागला असल्याचं म्हणत होती. पण पंचांनी बाद दिलं. पंचांनी हरमनप्रीत झेलबाद होण्याचीही वाट पाहिली नाही. त्या चेंडूवर हरमनप्रीत झेलबाद होऊ शकली असती. पण तिला पायचितच ठरवण्यात आलं. यामुळे नाराज झालेल्या हरमनने स्टम्पवर बॅट मारली. सामन्यानंतर बोलताना हरमनप्रीतने म्हटलं की, बांगलादेशने चांगली फलंदाजी केली. त्यांनी पळून धावा काढल्या आणि आम्ही फलंदाजी करत असताना त्यांच्या गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. पण खराब अंपायरिंगमुळे सामन्याचं चित्र बदललं. पंचांनी दिलेल्या काही निर्णयामुळे आम्ही नाराज आहे. मला वाटतं या खेळातून खूप शिकण्यासारखं होतं. अंपायरिंगमुळे आम्ही खूपच आश्चर्यचकित होतो.