मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs SL : कृणालच्या कोरोनानंतर नवं संकट, आजही होणार नाही दुसरी टी-20 मॅच?

IND vs SL : कृणालच्या कोरोनानंतर नवं संकट, आजही होणार नाही दुसरी टी-20 मॅच?

कृणाल पांड्याची (Krunal Pandya) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्यामुळे भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात मंगळवारी होणारी दुसरी टी-20 मॅच स्थगित करण्यात आली.

कोलंबो, 28 जुलै : कृणाल पांड्याची (Krunal Pandya) कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्यामुळे भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात मंगळवारी होणारी दुसरी टी-20 मॅच स्थगित करण्यात आली. यानंतर हा टी-20 सामना बुधवारी खेळवला जाईल, असं सांगितलं गेलं. पण आता बुधवारी देखील मॅच होईल का नाही, याबाबत साशंकता आहे. या सामन्याबाबतचा निर्णय होण्यासाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

कृणाल पांड्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सगळ्या खेळाडूंची पुन्हा एकदा आरटी-पीसीआर टेस्ट केली गेली. कृणालच्या संपर्कात आलेल्या 9 खेळाडूंवर विशेष लक्ष दिलं जात आहे. या सगळ्यांची पहिली कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली, पण यानंतर पुन्हा एकदा त्यांची कोरोना टेस्ट केली गेली आहे. या खेळाडूंचे रिपोर्ट संध्याकाळी 6 वाजता येणार आहेत. जर पुन्हा खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले तर बुधवारी दुसरी टी-20 खेळवली जाईल, पण मॅच आजही स्थगित करावी लागली तर मात्र ही सीरिजच रद्द करण्याचं संकट ओढावू शकतं.

शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वात भारताने 3 मॅचच्या या सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. जर दुसऱ्या सामन्यात भारताचा विजय झाला तर सीरिजही टीमच्या खिशात जाईल. याआधी वनडे सीरिजमध्ये भारताचा 2-1 ने विजय झाला होता.

First published:
top videos

    Tags: Coronavirus, India Vs Sri lanka, Krunal Pandya, T20 cricket