जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND Vs SL : भर सामन्यात मोठा अपघात, खेळाडूला स्ट्रेचरवरून न्यावं लागलं बाहेर

IND Vs SL : भर सामन्यात मोठा अपघात, खेळाडूला स्ट्रेचरवरून न्यावं लागलं बाहेर

IND Vs SL : भर सामन्यात मोठा अपघात, खेळाडूला स्ट्रेचरवरून न्यावं लागलं बाहेर

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीने मारलेला चेंडू अडवताना श्रीलंकेचे दोन क्षेत्ररक्षक एकमेकांना धडकले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 जानेवारी : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीने मारलेला चेंडू अडवताना श्रीलंकेचे दोन क्षेत्ररक्षक एकमेकांना धडकले. यामध्ये अशेन बंडारा आणि वँडरसे यांना दुखापत झाली आहे. यामुळे दोघांनाही मैदान सोडावं लागलं. विराट कोहली 94 धावांवर खेळत असताना त्याने फटकावलेला चेंडू अडवण्यासाठी श्रीलंकेचे दोन खेळाडू धावत होते. सीमारेषेवर चेंडू अडवत असताना अशेन बंडारा वँडरसेला जोरात धडकला. यात त्यानतंर श्रीलंकेचे फिजिओ मैदानात आले. खेळाडूंसोबत चर्चा केल्यानतंर स्ट्रेचर आणण्यात आले. बंडारा आणि वंँडरसेला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आलं.

जाहिरात

चेंडू अडवत असताना बंडाराचा पाय वँडरसेच्या पोटाला जोरात लागला. तर बंडाराच्या मानेला मार लागला. यामनंतर काही काळ सामना थांबवण्यात आला होता. सामना पुन्हा सुरू झाल्यानतंर विराट कोहलीने श्रीलंकेच्या खेळाडूकडे आधी दोघांच्या प्रकृतीबाबत विचारणा केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cricket
  • First Published :
जाहिरात
जाहिरात