टीम इंडियाने अचानक कोलकात्याहून रांचीला बोलावलं, कसोटीत करणार पदार्पण

टीम इंडियाने अचानक कोलकात्याहून रांचीला बोलावलं, कसोटीत करणार पदार्पण

विजय हजारे ट्रॉफीत खेळणाऱ्या या खेळाडूला 8 सामन्यात फक्त 2 गडी बाद करता आलेत. कुलदीप यादवच्या जागी त्याला संघात स्थान दिलं असून इशांतच्या जागी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे.

  • Share this:

रांची, 19 ऑक्टोबर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघात फिरकीपटू शाहबाज नदीमची वर्णी लागली आहे. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. इशांत शर्माच्या जागी शाहबाज नदीमचा संघात समावेश करण्यात आला आहे.

शाहबाज नदीम चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या जागी खेळणार आहे. शुक्रवारी अचानक कुलदीप यादवच्या खांद्यात वेदना सुरु झाल्या. त्यानंतर कुलदीपला पर्याय म्हणून शाहबाज नदीमला बोलावण्यात आलं आहे. फिरकीपटू असलेला शाहबाज नदीमने घरेलू क्रिकेटमध्ये आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. शाहबाजने एका रणजी हंगामा 50 पेक्षा जास्त विकेट घेण्याची कामगिरी दोनवेळा केली आहे. भारतीय संघात खेळण्यासाठी त्याला संपर्क केला तेव्हा तो विजय हजारे ट्रॉफीत खेळत होता. त्यानंतर कोलकात्याहून शाहबाज रांचीला पोहचला. झारखंडचा असलेल्या शाहबाजचे रांची हे होमग्राउंड आहे.

शाहबाज नदीमला गेल्या वर्षी विंडीजविरुद्ध कसोटी संघात स्थान मिळालं होतं पण प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नव्हती. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला इशांत शर्माच्या जागी संघात स्थान मिळालं आहे. तिसऱ्या कसोटीत भारत तीन फिरकीपटूंसह खेळणार आहे. कुलदीप यादवला दुखापत झाल्यानं नदीमला संधी मिळाली. त्याच्याशिवाय रविचंद्रन अश्विन आणि जडेजा यांच्यावर फिरकीची भीस्त असेल.

विजय हजारे ट्रॉफीत शाहबाज नदीमची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. त्याने 8 सामन्यात 2 गडी बाद केले आहेत. शाहबाज नदीम हा विजय हजारे ट्रॉफीत सर्वात कमी गडी बाद कऱणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे.

भारतीय संघाने याआधीचे दोन्ही सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. विशाखापट्टणम इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने 203 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात एक डाव 137 धावांनी मोठा विजय भारतानं साजरा केला. आता रांचीतील कसोटी जिंकून क्लीन स्वीपच्या इराद्याने भारतीय संघ उतरेल.

VIDEO : राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना थेट सवाल, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: IND VS SA
First Published: Oct 19, 2019 09:43 AM IST

ताज्या बातम्या