जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs NZ : रोहितने मारला Bullet Shot, सोढीने एका हातात पकडला भन्नाट कॅच, VIDEO

IND vs NZ : रोहितने मारला Bullet Shot, सोढीने एका हातात पकडला भन्नाट कॅच, VIDEO

IND vs NZ : रोहितने मारला Bullet Shot, सोढीने एका हातात पकडला भन्नाट कॅच, VIDEO

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs New Zealand 3rd T20) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता, 21 नोव्हेंबर : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाचा (India vs New Zealand 3rd T20) कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. या सीरिजच्या तिन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्माने टॉस जिंकला होता. पहिल्या दोन्ही सामन्यात पहिले बॉलिंग घेतल्यानंतर यावेळी मात्र रोहितने वेगळा निर्णय घेऊन किवी टीमला धक्का दिला. यानंतर बॅटिंगला आलेल्या रोहित शर्मा आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांनी न्यूझीलंडच्या बॉलर्सची धुलाई केली. ईशान किशन आणि रोहित शर्मा यांच्यात 6.2 ओव्हरमध्ये 69 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली. 21 बॉलमध्ये 29 रन करून ईशान किशन आऊट झाला, पण रोहित शर्माने न्यूझीलंडच्या बॉलर्सवर आक्रमण सुरूच ठेवलं. 31 बॉलमध्ये 56 रन करून रोहित शर्मा आऊट झाला. 180.65 च्या स्ट्राईक रेटने खेळलेल्या रोहितने 5 फोर आणि 3 सिक्स मारल्या. ईश सोढीने (Ish Sodhi Catch) रोहित शर्माच्या आपल्याच बॉलिंगवर भन्नाट कॅच पकडला. सोढीने टाकलेला बॉल रोहित शर्माने सरळ आणि खूप जोरात मारला, पण ईश सोढीने एका हातामध्येच हा कॅच पकडला. रोहित शर्माची विकेट भारतासाठी मोठा धक्का ठरला, कारण भारताचे प्रमुख खेळाडू आधीच पॅव्हेलियनमध्ये परतले होते. रोहित शर्माच्या आधी ईशान किशन, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत आऊट झाले होते.

जाहिरात

रोहितने या सामन्यात केएल राहुल आणि आर.अश्विनला विश्रांती दिली. त्यांच्याऐवजी ईशान किशन आणि युझवेंद्र चहलला संधी देण्यात आली आहे. सीरिजच्या पहिल्या दोन्ही मॅच जिंकल्यामुळे भारताने सीरिज आधीच खिशात टाकली आहे. केएल राहुल हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, मागच्या 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये राहुलने 4 अर्धशतकं केली आहेत, तर अश्विनने टी-20 वर्ल्ड कपमधून या फॉरमॅटमध्ये पुनरागमन केलंय. राहुल आणि अश्विन यांना यानंतर दोन टेस्ट मॅचची सीरिजही खेळायची आहे, त्यामुळे त्यांना विश्रांती देण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात