मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /FAB 4 मध्ये अशी आहे विराटची अवस्था, पाहा कोण किती 'पाण्यात'

FAB 4 मध्ये अशी आहे विराटची अवस्था, पाहा कोण किती 'पाण्यात'

विराटचा संघर्ष सुरूच

विराटचा संघर्ष सुरूच

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. इंग्लंड दौऱ्यातही (India tour of England) विराटची बॅट शांतच आहे.

हेडिंग्ले, 27 ऑगस्ट : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. इंग्लंड दौऱ्यातही (India tour of England) विराटची बॅट शांतच आहे. टेस्ट सीरिजच्या 4 इनिंगमध्ये त्याने 0, 42, 20 आणि 7 रन केले. विराटचे चाहते त्याच्या शतकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कोहलीच्या बॅटमधून अखेरचं शतक 2019 साली आलं होतं. यानंतर क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये त्याला शतक करता आलं नाही. टेस्ट क्रिकेटमधल्या फॅब 4 मध्ये असलेल्या विराटच्या नावावर 27 टेस्ट शतकं आहेत.

विराटने 94 टेस्टमध्ये 27 शतकं आणि 25 अर्धशतकं केली आहेत. नोव्हेंबर 2019 साली बांगलादेशविरुद्ध विराटचं अखेरचं शतक आलं होतं. यानंतर 18 टेस्ट इनिंगमध्ये त्याला एकही शतक करता आलं नाही. फक्त टेस्ट क्रिकेटच नाही तर वनडेमध्येही त्याने मागचं शतक ऑगस्ट 2019 साली केलं होतं, यानंतर 15 इनिंगमध्ये विराटची बॅट शांतच आहे.

स्टीव्ह स्मिथ : ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) 77 टेस्टमध्ये 27 शतकं आणि 31 अर्धशतकं केली आहेत. स्मिथने अखेरचं टेस्ट शतक याचवर्षी जानेवारी महिन्यात भारताविरुद्ध झळकावलं होतं. यानंतर 3 इनिंगमध्ये त्याने 2 अर्धशतकं केली. वनडेमध्ये स्मिथने अखेरचं शतक नोव्हेंबर 2020 साली भारताविरुद्धच केलं होतं. यानंतर तो फक्त एकच वनडे खेळला.

केन विलियमसन : न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनने (Kane Williamson) 85 टेस्टमध्ये 24 शतकं आणि 33 अर्धशतकं केली. त्याने मागचं टेस्ट शतक यावर्षी जानेवारी महिन्यात पाकिस्तानविरुद्ध लगावलं. विलियमसनने त्या सामन्यात 238 रनची खेळी केली. यानंतर विलियमसनने 2 टेस्टच्या 4 इनिंग खेळला. वनडेमध्ये विलियमसनने अखेरचं शतक जून 2019 साली वेस्ट इंडिजविरुद्ध केलं होतं. यानंतर तो 7 वनडे खेळला.

जो रूट : इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या (Joe Root) नावावर 108 टेस्टमध्ये 23 शतकं आणि 50 अर्धशतकं आहेत. भारताविरुद्ध लीड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये रूटने 121 रनची खेळी केली. याआधी रूटने लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये नाबाद 180 रन केले होते. भारताविरुद्धच्या या सीरिजमध्ये रूटने लागोपाठ तीन मॅचमध्ये तीन शतकं केली आहेत. वनडेमध्ये रूटने अखेरचं शतक जून 2019 साली वेस्ट इंडिजविरुद्ध केलं.

First published:

Tags: India vs england, Joe root, Steven smith, Virat kohli