मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : कोहली-अंडरसन मैदानात भिडले, विराटने दिलेल्या शिवीचा VIDEO VIRAL

IND vs ENG : कोहली-अंडरसन मैदानात भिडले, विराटने दिलेल्या शिवीचा VIDEO VIRAL

विराट-अंडरसनचा मैदानात पंगा

विराट-अंडरसनचा मैदानात पंगा

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरू असलेल्या लॉर्ड्स टेस्टमध्ये (Lords Test) खेळासोबतच वादही रंगत आहेत. जेम्स अंडरसन (James Anderson) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यात चौथ्या दिवशी बाचाबाची झाली.

लंडन, 15 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरू असलेल्या लॉर्ड्स टेस्टमध्ये (Lords Test) खेळासोबतच वादही रंगत आहेत. मॅचच्या तिसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने (Jaspirt Bumrah) जेम्स अंडरसनला (James Anderson) भेदक बॉलिंग केली. दिवसाचा खेळ संपल्यानंतर अंडरसन बुमराहला उद्देशून बोलला होता, याचा पुढचा अंक चौथ्या दिवशी पाहायला मिळाला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) जेम्स अंडरसनला प्रत्युत्तर दिलं. या दोघांमध्ये मैदानात बाचाबाचीही झाली.

चौथ्या दिवशी 17 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. अंडरसनच्या 9 व्या ओव्हरचा चौथा बॉल झाल्यानंतर विराटने आक्षेप घेतले. जेम्स अंडरसन खेळपट्टीवर धावत असल्याची तक्रार विराट कोहलीने केली. विराटच्या या तक्रारीनंतर अंडरसन भडकला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला.

'तू मला अपशब्द वापरत आहेस का? हे तुझं घरचं अंगण नाही', असं म्हणत विराटने अंडरसनला शिवी दिली. यानंतर जेम्स अंडरसननेही विराटला प्रत्युत्तर दिलं. संपूर्ण ओव्हर या दोघांमध्ये वाद सुरू होते. म्हातारा झाल्यामुळे तुझं असं झालं आहे, असा टोमणाही विराटने अंडरसनला मारला. अंडरसनचा स्पेल संपल्यामुळे या दोघांमधला वाद निवळला.

विराट कोहली याचा मैदानातला संघर्ष मात्र अजूनही सुरूच आहे. 20 रनवर विराट कोहली सॅम करनच्या बॉलिंगवर आऊट झाला. सातव्या स्टम्पवर असलेला बॉल खेळण्याचा प्रयत्न विराट कोहलीने केला, पण बॅटचा एजला बॉल लागला आणि विकेट कीपर जॉस बटलरने कॅच पकडला. विराटने खेळलेल्या या खराब शॉटवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

First published:
top videos

    Tags: India vs england, James anderson, Virat kohli