मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : सिराजने दोन बॉलमध्ये बदललं मॅचचं चित्र, लॉर्ड्सवरच्या डबल धमाक्याचा VIDEO

IND vs ENG : सिराजने दोन बॉलमध्ये बदललं मॅचचं चित्र, लॉर्ड्सवरच्या डबल धमाक्याचा VIDEO

मोहम्मद सिराजने इंग्लंडला दिले दोन धक्के

मोहम्मद सिराजने इंग्लंडला दिले दोन धक्के

भारत आणि इंग्लंड (India vs England 2nd Test) यांच्यातली दुसरी टेस्ट अत्यंत चुरशीची सुरू आहे. मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) लागोपाठ दोन बॉलला दोन विकेट घेऊन भारताला पुन्हा एकदा सामन्यात आणलं.

लंडन, 13 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England 2nd Test) यांच्यातली दुसरी टेस्ट अत्यंत चुरशीची सुरू आहे. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू असलेल्या या सामन्याचा पहिला दिवस केएल राहुलने (KL Rahul) त्याच्या शतकाने गाजवला, यानंतर दुसऱ्या दिवशी इंग्लंडने मॅचमध्ये पुनरागमन करत भारताचा 364 रनवर ऑल आऊट केला, त्यानंतर बॅटिंगला आलेल्या इंग्लंडच्या दोन्ही ओपनरनी सावध सुरूवात केली, पण मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) भारताला पुन्हा एकदा सामन्यात आणलं.

मोहम्मद सिराजने लागोपाठ दोन बॉलला इंग्लंडच्या दोन बॅट्समनना माघारी धाडलं. 15 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला सिराजने डॉमनिक सिबलीची (Dominic Sibley) विकेट घेतली, तर यानंतर पुढच्याच बॉलला त्याने हसीब हमीदला (Haseeb Hameed) बोल्ड केलं. सिबली 11 रन करून आऊट झाला, त्याचा कॅच केएल राहुलने पकडला. पाच वर्षांनंतर टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या हसीब हमीदने निराशा केली. पहिल्याच बॉलला हमीद बोल्ड झाला. झॅक क्रॉलेच्याऐवजी हमीदला संधी देण्यात आली होती, पण या संधीचं त्याला सोनं करता आलं नाही.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये मोहम्मद सिराजला एकूण तीन विकेट मिळाल्या होत्या. दुसऱ्या इनिंगमध्ये जॉनी बेयरस्टोला आऊट केल्यानंतर, सिराजने केलेलं सेलिब्रेशन वादात सापडलं होतं. बेयरस्टोची विकेट घेतल्यानंतर सिराजने तोंडावर बोट ठेवलं होतं, यावरून दिनेश कार्तिकने नाराजी व्यक्त केली होती. दिनेश कार्तिक हा सध्या इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिजची कॉमेंट्री करत आहे. कार्तिकने नाराजी व्यक्त केल्यानंतरही सिराजने या टेस्टमध्येही विकेट घेतल्यानंतर तसंच सेलिब्रेशन केलं.

First published:

Tags: Cricket, India vs england