मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : भारत-इंग्लंड सीरिजनंतर दिग्गज क्रिकेटपटू घेणार संन्यास!

IND vs ENG : भारत-इंग्लंड सीरिजनंतर दिग्गज क्रिकेटपटू घेणार संन्यास!

महान खेळाडू निवृत्त होणार?

महान खेळाडू निवृत्त होणार?

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरू असलेली टेस्ट सीरिज रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. या सीरिजनंतर महान खेळाडू निवृत्त होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई, 30 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात सुरू असलेली टेस्ट सीरिज रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवला, यानंतर इंग्लंडने जोरदार पुनरागमन करत तिसरी टेस्ट इनिंग आणि 76 रनने जिंकली, त्यामुळे आता सीरिज 1-1 ने बरोबरीत आहे. 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजची चौथी टेस्ट 2 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

इंग्लंडचा महान फास्ट बॉलर जेम्स अंडरसन (James Anderson) याने टीम इंडिया आणि कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) चांगलाच त्रास दिला आहे, पण या सीरिजनंतर तो निवृत्त होईल, असा दावा इंग्लंडचा माजी फास्ट बॉलर स्टीव्ह हार्मिनसनने (Steve Harminson) केला आहे.

जेम्स अंडरसनने या सीरिजच्या 3 टेस्टमध्ये 13 विकेट घेतल्या आहेत. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरला जेम्स अंडरसनने त्रास दिला आहे. भारताविरुद्धची पाचवी टेस्ट अंडरसनचं होम ग्राऊंड ओल्ड ट्रॅफर्डवर होणार आहे. 39 वर्षांचा जेम्स अंडरसन आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर अखेरचा सामना खेळेल, असं हार्मिनसनला वाटतंय. जेम्स अंडरसन याने मात्र आपल्याला 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या ऍशेसमध्ये खेळायचं आहे, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

टॉकस्पोर्टसोबत बोलताना हार्मिनसनने अंडरसनच्या निवृत्तीचं भाकित केलं. 'अंडरसन ओल्ड ट्रॅफर्ड टेस्टनंतर निवृत्त होईल, असं मला वाटतं. ऍशेस सीरिजमध्ये तो खेळेल, असं मला वाटत नाही. अखेरच्या टेस्टमध्ये ओल्ड ट्रॅफर्डच्या घरचा मैदानात विराटला त्रास देऊन करियर संपवणं, यापेक्षा चांगला शेवट काय असू शकतो,' असं हार्मिनसन म्हणाला.

First published:

Tags: India vs england, James anderson