मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : विराटचं 'गोल्डन डक', अंडरसनबद्दलच्या वक्तव्यामुळे कॅप्टनची खिल्ली

IND vs ENG : विराटचं 'गोल्डन डक', अंडरसनबद्दलच्या वक्तव्यामुळे कॅप्टनची खिल्ली

इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज सुरू व्हायच्या आधी टीम इंडियाचा (India vs England) कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) जेम्स अंडरसनबाबत (James Anderson) प्रश्न विचारण्यात आला होता.

  • Published by:  Shreyas

नॉटिंघम, 5 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज सुरू व्हायच्या आधी टीम इंडियाचा (India vs England) कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) जेम्स अंडरसनबाबत (James Anderson) प्रश्न विचारण्यात आला होता. जेम्स अंडरसनचा सामना कसा करशील? असं विराटला विचारण्यात आलं, तेव्हा त्याने मी फक्त बॅटिंग करेन, असं उत्तर दिलं होतं. पण नॉटिंघम टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये विराट फक्त एक बॉल खेळू शकला. जेम्स अंडरसनच्या आऊट स्विंग बॉलवर विराटकडे कोणतंही उत्तर नव्हतं. गोल्डन डकवर आऊट झाल्यानंतर विराट कोहलीची सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यात येत आहे.

जेम्स अंडरसनच्या बॉलिंगवर विकेट कीपर जॉस बटलरने (Jos Butller) विराट कोहलीचा कॅच पकडला, यानंतर सोशल मीडियावर विराट कोहलीचे मीम्स व्हायरल झाले. विराट कोहली आणि जेम्स अंडरसन यांच्यातलं द्वंद्व 2014 पासून सुरू आहे. 2014 सालच्या इंग्लंड दौऱ्यात अंडरसनने विराटला खेळपट्टीवर टिकून दिलं नव्हतं, यानंतर 2018 साली विराटने याची परतफेड केली आणि इंग्लंडमध्ये धमाकेदार कामगिरी केली. सीरिजच्या एकही टेस्टमध्ये विराटने अंडरसनला विकेट दिली नाही. 2021 साली मात्र पहिल्याच टेस्टच्या पहिल्या बॉलला अंडरसनने विराटला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

विराट कोहली इंग्लंडविरुद्ध तिसऱ्यांदा आणि टेस्ट करियरमध्ये पाचव्यांदा गोल्डन डकवर आऊट झाला. 2011-12 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेन हिलफेनहाऊसने विराटला शून्यवर आऊट तेलं होतं. इंग्लंडविरुद्ध 2014 साली लियाम प्लंकेटने, 2018 साली स्टुअर्ट ब्रॉडने विराटला गोल्डन डकवर माघारी पाठवलं. यानंतर 2019 साली वेस्ट इंडिजच्या केमार रोचविरुद्धही विराट शून्य रनवर आऊट झाला होता. विराट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 9 व्यांदा जेम्स अंडरसनसमोर आऊट झाला. अंडरसनने सचिनला 12 वेळा आणि धोनीला 10 वेळा आऊट केलं आहे.

First published:

Tags: India vs england, James anderson, Virat kohli