नॉटिंघम, 6 ऑगस्ट : इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसन (James Anderson) याने इतिहास घडवला आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये अंडरसनने केएल राहुलची (KL Rahul) विकेट घेत अनिल कुंबळेला मागे टाकलं. जेम्स अंडरसन आता टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) 619 विकेटच्या विक्रमाला अंडरसनने मागे टाकलं. केएल राहुलला अंडरसनने 84 रनवर आऊट केलं. याआधी त्याने पुजारा (Cheteshwar Pujara) आणि विराट कोहलीलाही (Virat Kohli) पॅव्हेलियनमध्ये पाठवलं होतं.
James Anderson, at 39, becomes the third-highest wicket-taker in Test cricket 🐐#ENGvIND | #WTC23 pic.twitter.com/vo874jWePa
— ICC (@ICC) August 6, 2021
टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (Muthaiya Muralitharan) पहिल्या क्रमांकावर आहे. मुरलीधरनच्या नावावर 800 विकेट आहेत, तर शेन वॉर्नने (Shane Warne) 708 विकेट मिळवल्या. ग्लेन मॅकग्राने (Glenn McGrath) टेस्ट क्रिकेटमध्ये 563 विकेट घेतल्या. जेम्स अंडरसन टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा फास्ट बॉलर आधीच झाला आहे.
जेम्स अंडरसनने 26.56 च्या सरासरीने 163 मॅचमध्ये 619 विकेटचा टप्पा ओलांडला. अंडरसनने त्याच्या टेस्ट करियरमध्ये एका इनिंगमध्ये 5 विकेट घेण्याचा पराक्रम 30 वेळा केला, तर मॅचमध्ये 10 विकेट त्याने 3 वेळा घेतला. 42 रनवर 7 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 22 मार्च 2003 ला झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातून अंडरसनने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India vs england, James anderson