मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : भारताविरुद्धच्या सीरिजसाठी इंग्लंडच्या टीमची घोषणा, 'धोकादायक' खेळाडू बाहेर

IND vs ENG : भारताविरुद्धच्या सीरिजसाठी इंग्लंडच्या टीमची घोषणा, 'धोकादायक' खेळाडू बाहेर

इंग्लंडने

इंग्लंडने

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या (India vs England) पहिल्या 2 टेस्टसाठी टीमची घोषणा केली आहे. 4 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी जो रूटकडे (Joe Root) इंग्लंडच्या टीमचं नेतृत्व आहे.

लंडन, 21 जुलै : इंग्लंड क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या (India vs England) पहिल्या 2 टेस्टसाठी टीमची घोषणा केली आहे. 4 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी जो रूटकडे (Joe Root) इंग्लंडच्या टीमचं नेतृत्व आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC) दुसऱ्या सत्राची दोन्ही टीमची ही पहिलीच सीरिज असणार आहे, त्यामुळे दोन्ही टीम चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करतील.

फास्ट बॉलर ओली रॉबिनसन (Ollie Robinson) याचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजदरम्यान सोशल मीडियावरच्या वादामुळे रॉबिनसनचं निलंबन करण्यात आलं होतं. रॉबिनसनशिवाय बेन स्टोक्स, जॉस बटलर, जॉनी बेयरस्टो आणि सॅम करन यांनीही टीममध्ये कमबॅक केलं आहे. फास्ट बॉलर क्रिस वोक्सला दुखापतीमुळे टीममध्ये जागा मिळाली नाही, तर जोफ्रा आर्चर (Jofra Archer) शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे फिट झाला नाही, त्यामुळे तोदेखील पहिल्या दोन टेस्टमध्ये दिसणार नाही.

विराट-रहाणेला दुखापत

टीम इंडिया टेस्टआधी तीन दिवसीय सराव सामना खेळत आहे. मंगळवारी सुरू झालेल्या या सामन्यात विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे दुखापतीमुळे खेळू शकले नाहीत. हॅमस्ट्रिंगमुळे रहाणेने इंजक्शन घेतलं, पण त्याचं पहिली टेस्ट खेळणं कठीण दिसत आहे. तर विराट कोहलीला पाठदुखीचा त्रास होत आहे. सराव सामन्यामध्ये केएल राहुलने शतक करत, टीम इंडियाचा दरवाजा ठोठावला आहे. शुभमन गिल दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर झाल्यामुळे रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल ओपनिंग करताना दिसतील, हे निश्चित मानलं जातंय.

भारत-इंग्लंड सीरिजचं वेळापत्रक

पहिली टेस्ट : ट्रेन्ट ब्रिज, 4 ऑगस्टपासून

दुसरी टेस्ट : लॉर्ड्स, 12 ऑगस्टपासून

तिसरी टेस्ट : हेडिंग्ली, 25 ऑगस्टपासून

चौथी टेस्ट : ओवल, 2 सप्टेंबरपासून

पाचवी टेस्ट : ओल्ड ट्रॅफर्ड, 10 सप्टेंबरपासून

इंग्लंडची टीम

जो रूट (कर्णधार), जेम्स एंडरसन, जॉनी बेयरस्टो, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जॉस बटलर, जॅक क्रॉले, सॅम करेन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिनसन, डॉम सिब्ले, बेन स्टोक्स, मार्क वूड

First published:
top videos

    Tags: Cricket, India vs england, Jofra archer