• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : अमिताभ बच्चन यांचं जो रूटबद्दलचं ट्वीट VIRAL, डिलीट करण्याची जोरदार मागणी

IND vs ENG : अमिताभ बच्चन यांचं जो रूटबद्दलचं ट्वीट VIRAL, डिलीट करण्याची जोरदार मागणी

बिग बींचं जो रूटबद्दलचं ट्वीट व्हायरल

बिग बींचं जो रूटबद्दलचं ट्वीट व्हायरल

जो रूट (Joe Root एकीकडे भारतीय टीमसाठी (India vs England) अडचणीचा ठरत असतानाच महान अभिनेते अमिताभ बच्चन (Amithabh Bachchan) यांचं जुनं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा (India vs England Third Test) इनिंग आणि 76 रनने लाजिरवाणा पराभव झाला आहे. याचसोबत 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये इंग्लंडने 1-1 ने बरोबरी केली आहे. या सीरिजमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट (Joe Root) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. लागोपाठ तीन टेस्टमध्ये रूटने तीन शतकं केली आहेत. भारतीय बॉलर्ससाठी रूट डोकेदुखी ठरत आहे. जो रूट एकीकडे भारतीय टीमसाठी अडचणीचा ठरत असतानाच महान अभिनेते अमिताभ बच्चन (Amithabh Bachchan) यांचं जुनं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिग बींनी हे ट्वीट डिलीट करावं, अशी मागणी चाहत्यांनी केली आहे. 2016 साली अमिताभ बच्चन यांनी हे ट्वीट केलं होंत. मोहालीमध्ये झालेल्या सामन्यात विराटने 51 बॉलमध्ये नाबाद 82 रनची खेळी केली होती. या खेळीमुळे टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलला पोहोचली होती. यानंतर इंग्लंडचा माजी ऑल राऊंडर एन्ड्रयू फ्लिंटॉफ याने एक ट्वीट केलं होतं. विराट जर याच वेगाने खेळला तर तो एक दिवस रूटची बरोबरी करेल, असं फ्लिंटॉफ म्हणाला होता. अमिताभ बच्चन यांनी फ्लिंटॉफच्या या ट्वीटला उत्तर दिलं होतं. कोण रूट? मुळासकट उखडू रूटला, असं बिग बी म्हणाले होते. आता चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांना हे ट्वीट डिलीट करण्याची विनंती केली आहे. रूटने अमिताभ बच्चन यांचं हे ट्वीट तर बघितलं नाही ना? असा प्रश्न एकाने विचारला. जो रूटने या सीरिजच्या 5 इनिंगमध्ये 64, 109, 180 नाबाद, 33 आणि 121 रन केले आहेत. 5 टेस्ट मॅचची ही सीरिज आता 1-1 ने बरोबरी केली आहे. सीरिजची चौथी टेस्ट 2 सप्टेंबरपासून ओव्हलमध्ये सुरू होणार आहे.
  Published by:Shreyas
  First published: