मुंबई, 4 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातली एजबॅस्टन टेस्ट रोमांचक स्थितीमध्ये पोहोचली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची आघाडी 250 रनच्या पुढे पोहोचली आहे आणि टीमच्या हातात आणखी 7 विकेट शिल्लक आहेत. मॅचच्या तिसऱ्या दिवशी रविवारी वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद ओढावला आहे. सेहवाग सोनीसाठी हिंदीमध्ये कॉमेंट्री करत आहे. सेहवागने विराट कोहलीबाबत (Virat Kohli) केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. एवढच नाही तर अनेक यूजर्सनी सेहवागला कॉमेंट्रीमधून काढून टाकण्याचीही मागणी केली आहे.
इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमध्ये 62व्या ओव्हरला मोहम्मद सिराजने मॅथ्यू पॉट्सला आऊट केलं, तेव्हा विराटने डान्स करून सेलिब्रेशन केलं. त्यावेळी सेहवाग कॉमेंट्री करत होता. 'देखो छमिया नाच रही है', असं सेहवाग म्हणाला. सेहवागचं हे वक्तव्य काही मिनिटांमध्येच सोशल मीडियावर व्हायरल झालं.
सेहवागला कॉमेंट्री पॅनलच्या बाहेर ठेवणं मला समजण्यापलीकडे आहे. सेहवागला काय बोलायचं हे कळत नाही, त्याची कॉमेंट्री खराब आहे. हिंदी कॉमेंट्रीचा स्तर दिवसेंदिवस घसरत चालला आहे, अशा वेगवेगळ्या कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.
Sack him @SonySportsNetwk https://t.co/DcDrtpWMzY
— A (@aryaan__18) July 3, 2022
@virendersehwag should be banned. First called Rohit Vadapav, then posted a had ads apology and now this. Commentators can’t get away with this shit. The country is listening. There need to be consequences. @BCCI #ViratKohli @SkyCricket #RohitSharma #CricketTwitter #ENGvIND https://t.co/vYaXHH5Ob1
— Kamakshi Kaul (@MahiRatIsGOAT) July 3, 2022
एजबॅस्टन टेस्टच्या तिसऱ्या दिवशी विराटने जॉनी बेयरस्टोचं स्लेजिंग केलं, यानंतरही सेहवागने विराटवर निशाणा साधला होता. 'कोहलीच्या स्लेजिंगआधी बेयरस्टोचा स्ट्राईक रेट 21 होता. पण स्लेजिंगनंतर तो 150 च्या स्ट्राईक रेटने खेळला. बेयरस्टो पुजारासारखा खेळत होता, पण कोहलीच्या स्लेजिंगमुळे तो पंत झाला,' असं ट्वीट सेहवागने केलं.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये कोहली आणि बेयरस्टो यांच्यात बाचाबाची झाली होती. या दोघांमधला वाद वाढल्यामुळे दोन्ही अंपायरना हस्तक्षेप करावा लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.