मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : 'स्वत:ला बॅट्समन समजतो...', अंडरसनच्या वक्तव्यावर जडेजाचा पलटवार

IND vs ENG : 'स्वत:ला बॅट्समन समजतो...', अंडरसनच्या वक्तव्यावर जडेजाचा पलटवार

इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन टेस्टमध्ये टीम इंडिया (India vs England) मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. पहिल्या दिवशी ऋषभ पंतने (Rishabh Pant) आक्रमक शतक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजानेही (Ravindra Jadeja) शतकी खेळी केली. जडेजाच्या या खेळीनंतर जेम्स अंडरसनने (James Anderson) त्याच्यावर निशाणा साधला होता.

पुढे वाचा ...

मुंबई, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन टेस्टमध्ये टीम इंडिया (India vs England) मजबूत स्थितीमध्ये पोहोचली आहे. पहिल्या दिवशी ऋषभ पंतने (Rishabh Pant) आक्रमक शतक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजानेही (Ravindra Jadeja) शतकी खेळी केली. जडेजाने मागच्या काही काळात टेस्ट क्रिकेटमध्ये उत्कृष्ट बॅटिंग केली आहे. एजबॅस्टनमधल्या जडेजाच्या या खेळीनंतर इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसनने (James Anderson) त्याच्यावर निशाणा साधला होता. त्यावर आता जडेजाने प्रत्युत्तर दिलं आहे.

रवींद्र जडेजाने या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये 104 रन केले, त्यामुळे भारताला 416 रनच्या मोठ्या स्कोअरपर्यंत मजल मारता आली. जडेजाच्या या खेळीवर जेम्स अंडरसनने प्रतिक्रिया दिली. टीम इंडियाचा ऑलराऊंडर स्वत:ला बॅट्समन समजायला लागला आहे. तो आता थोडी वर बॅटिंग करत आहे, तसंच तो बॉलला योग्य पद्धतीने सोडतो, त्यामुळे आमच्यासाठी अडचण निर्माण होते, असं अंडरसन म्हणाला.

अंडरसनच्या या वक्तव्यावर जडेजाला पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलं. जेव्हा मी रन करतो तेव्हा प्रत्येक जण हा बॅट्समन झाला आहे, असं म्हणतं. माझा प्रयत्न क्रीजवर जास्त वेळ घालवण्याचा असतो. जेम्स अंडरसनला हे माहिती झालं ही चांगली गोष्ट आहे. मी 2014 पासून बॅटिंग करत आहे. मी आनंदी आहे, असं उत्तर जडेजाने दिलं.

जडेजा-अंडरसनचा वाद

रवींद्र जडेजा आणि जेम्स अंडरसन यांच्यातला वाद 8 वर्ष जुना आहे. 2014 साली झालेल्या टेस्टमध्ये या दोघांमध्ये जोरदार राडा झाला होता. ड्रेसिंग रूममध्ये येऊन तुझे दात पाडेन, अशी धमकीही अंडरसनने जडेजाला दिली होती. तेव्हापासून या दोघांमध्ये शाब्दिक चकमकी होत असतात.

एजबॅस्टन टेस्टमध्ये टीम इंडियाने पहिले बॅटिंग करत 416 रन केले. यानंतर तिसऱ्या दिवसाच्या लंचपर्यंत इंग्लंडचा स्कोअर 200/6 एवढा झाला. ते अजून 216 रनने पिछाडीवर आहेत. जॉनी बेयरस्टो 113 बॉलमध्ये 91 रनवर खेळत आहे. भारताकडून बुमराहला 3, सिराज, शार्दुल आणि शमी यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली आहे.

First published:

Tags: India vs england, James anderson, Ravindra jadeja