जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs ENG : एका वर्षात काय बदललं? रवी शास्त्रींनी ठेवलं टीम इंडियाच्या दुखऱ्या जागेवर बोट!

IND vs ENG : एका वर्षात काय बदललं? रवी शास्त्रींनी ठेवलं टीम इंडियाच्या दुखऱ्या जागेवर बोट!

IND vs ENG : एका वर्षात काय बदललं? रवी शास्त्रींनी ठेवलं टीम इंडियाच्या दुखऱ्या जागेवर बोट!

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा (India vs England 5th Test) दारूण पराभव झाला. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडने 378 रनचं आव्हानही अगदी सहज पार केलं, यानंतर टीम इंडियाच्या बॉलिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी भारताच्या या पराभवाचं कारण सांगितलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाचा (India vs England 5th Test) दारूण पराभव झाला. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडने 378 रनचं आव्हानही अगदी सहज पार केलं, यानंतर टीम इंडियाच्या बॉलिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मागच्या वर्षी इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाने टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली होती, पण पाचव्या सामन्याआधी टीममध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आणि टेस्ट पुढे ढकलण्यात आली. हीच टेस्ट यावर्षी खेळवली गेली. मागच्यावर्षीपर्यंत फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाला अचानक काय झालं? असा प्रश्न उपस्थित झाला. टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. मुख्य म्हणजे रवी शास्त्री (Ravi Shastri) मागच्या वर्षी झालेल्या इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते. चौथ्या इनिंगमध्ये कर्णधार जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय बॉलर्सची कामगिरी सुमार झाली, पण रवी शास्त्री यांनी भारताच्या पराभवाला बॅट्समनना जबाबदार धरलं आहे. एजबॅस्टन टेस्टच्या चौथ्या दिवशी भारतीय बॅट्समननी खराब बॅटिंग केल्याचं शास्त्री म्हणाले. भारतीय खेळाडूंच्या बॉडी लँग्वेजला नेमकं काय झालं? खेळपट्टीसारखीच त्यांची बॉडी लँग्वेजही सपाट झाल्याची प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली. एजबॅस्टनमध्ये भारतीय बॅट्समनची कामगिरी निराशाजनक झाली. बॅट्समनकडे इंग्लंडला मॅचच्या बाहेर करण्याची संधी होती, त्यांना फक्त दोन सेशन बॅटिंग करण्याची गरज होती, पण टीमा डिफेन्सिव अप्रोच महागात पडला. विकेट गेल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी धोका पत्करण्याची गरज होती, पण यात त्यांना अपयश आलं, असं शास्त्री म्हणाले. भारतीय बॅट्समननी चौथ्या दिवशी सातत्याने विकेट गमावल्या, त्यामुळे इंग्लंडला बॅटिंग करण्यासाठी चांगला वेळ मिळाला. भारतीय खेळाडूंची हीच चूक झाल्याचं रवी शास्त्री यांनी सांगितलं. भारताला इंग्लंडमध्ये सीरिज जिंकण्याची ऐतिहासिक संधी चालून आली होती, पण या संधीचं त्यांना सोनं करता आलं नाही. भारताने इंग्लंडमध्ये शेवटची टेस्ट सीरिज 2007 साली जिंकली होती. रवी शास्त्रींनी कोचिंग सोडल्यानंतर टीम इंडियाची टेस्ट क्रिकेटमधली कामगिरी निराशाजनक झाली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पहिली टेस्ट जिंकल्यानंतर पुढच्या दोन्ही टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. तर इंग्लंडमधली ही टेस्टही भारताने गमावली. न्यूझीलंडची टीम भारत दौऱ्यावर आली होती तेव्हा भारताचा 1-0 ने विजय झाला, पण कानपूरमध्ये झालेली टेस्ट ड्रॉ झाली. टीम इंडियाने उशीरा डाव घोषित केल्यामुळे मॅच ड्रॉ झाल्याचा दावाही तेव्हा करण्यात आला. श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये मात्र टीम इंडियाचा 2-0 ने विजय झाला. मागच्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री यांनी प्रशिक्षकपद सोडलं, त्यानंतर राहुल द्रविडकडे ही जबाबदारी सोपावण्यात आली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात