Home /News /sport /

IND vs ENG : टीम इंडियाच्या बॅटिंगवर भडकले रवी शास्त्री, सांगितली सगळ्यात मोठी चूक

IND vs ENG : टीम इंडियाच्या बॅटिंगवर भडकले रवी शास्त्री, सांगितली सगळ्यात मोठी चूक

टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या चौथ्या दिवशी (India vs England 5th Test) भारतीय बॅट्समननी केलेल्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

    बर्मिंघम, 5 जुलै : टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या चौथ्या दिवशी (India vs England 5th Test) भारतीय बॅट्समननी केलेल्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. चौथ्या दिवशी भारतीय बॅट्समननी घाबरून रक्षात्मक खेळ केला, ज्यामुळे मॅचमध्ये इंग्लंडचं कमबॅक झाल्याचं रवी शास्त्री म्हणाले. पहिल्या इनिंगमध्ये 132 रनची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा 245 रनवर ऑल आऊट झाला. पाचव्या दिवशी इंग्लंडच्या टीमला विजयासाठी आणखी 119 रनची गरज आहे आणि त्यांच्या हातात 7 विकेट आहेत. जो रूट (Joe Root) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) खेळपट्टीवर आहेत. एजबॅस्टनच्या ग्राऊंडवर सुरू असलेल्या या टेस्टसाठी रवी शास्त्री स्काय स्पोर्ट्सच्या कॉमेंट्री टीममध्ये आहेत. भारतीय बॅट्समनना या टेस्टमधून इंग्लंडला बाहेर काढण्याची संधी होती. त्यांना 2 सत्र बॅटिंग करण्याची गरज होती, पण मला वाटतं ते रक्षात्मक खेळत होते आणि घाबरले होते. खासकरून लंचनंतर, अशी प्रतिक्रिया शास्त्रींनी दिली. विकेट गेल्यानंतरही ते धोका पत्करू शकले असते, त्यावेळी रन जास्त महत्त्वाच्या होत्या. भारताने पटापट विकेट गमावल्या, त्यामुळे इंग्लंडला बॅटिंगसाठी वेळ मिळाला, असं वक्तव्य शास्त्री यांनी केलं. मॅचच्या चौथ्या दिवशी पुजारा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूर यांनी चुकीचे शॉट मारले, तर रवींद्र जडेजा बचावात्मक खेळताना दिसला. पुजाराने ऑफ स्टम्पबाहेरचा बॉल कट मारण्याचा प्रयत्न केला, पण पॉईंटला उभ्या असलेल्या फिल्डरच्या हातात कॅच केला. यानंतर श्रेयस अय्यरवर इंग्लंडच्या फास्ट बॉलरनी बाऊन्सरचा मारा केला, या सापळ्यात अय्यर अडकला. तर ऋषभ पंतने रिव्हर्स स्वीप मारली आणि तो कॅच आऊट झाला. शार्दुल ठाकूरही बाऊन्सरवर हूक मारायला गेला. रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असताना भारताने सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली होती, पण टीम इंडियामध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे पाचवी टेस्ट पुढे ढकलण्यात आली होती. ही टेस्ट आता खेळवली जात आहे. पीटरसनचं बुमराहवर प्रश्नचिन्ह इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसनने (Kevin Pietersen) जसप्रीत बुमराहच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. बुमराहने डिफेन्सिव फिल्डिंग लावल्यामुळे इंग्लंडच्या बॅट्समनना एक-एक रन काढून स्ट्राईक बदलायला मदत झाली, असं पीटरसन म्हणाला आहे. 'बुमराहची रणनिती योग्य नव्हती. बॉल रिव्हर्स स्विंग होत असतानाही बॅट्समनचं काम सोपं झालं. पाचव्या दिवशी बुमराह वेगळी रणनिती घेऊन मैदानात उतरेल, अशी अपेक्षा आहे,' असं वक्तव्य पीटरसनने केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Ravi shastri

    पुढील बातम्या