Home /News /sport /

IND vs ENG : पुजारा-पंतची अर्धशतकं, एजबॅस्टन टेस्ट रोमांचक स्थितीमध्ये, इंग्लंडला 378 रनचं आव्हान

IND vs ENG : पुजारा-पंतची अर्धशतकं, एजबॅस्टन टेस्ट रोमांचक स्थितीमध्ये, इंग्लंडला 378 रनचं आव्हान

भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी टेस्ट (India vs England 5th Test) रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा 245 रनवर ऑल आऊट झाला. पहिल्या इनिंगमध्ये भारताला मिळालेल्या 132 रनच्या आघाडीमुळे आता इंग्लंडला विजयासाठी 378 रनची गरज आहे.

पुढे वाचा ...
    एजबॅस्टन, 4 जुलै : भारत आणि इंग्लंड यांच्यातली पाचवी टेस्ट (India vs England 5th Test) रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा 245 रनवर ऑल आऊट झाला. पहिल्या इनिंगमध्ये भारताला मिळालेल्या 132 रनच्या आघाडीमुळे आता इंग्लंडला विजयासाठी 378 रनची गरज आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताकडून चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांनी अर्धशतकं केली. पुजाराने 66 तर ऋषभ पंतने 57 रनची खेळी केली, याआधी ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी पहिल्या इनिंगमध्ये शतकं केल्यामुळे भारताला 416 रनपर्यंत मजल मारता आली होती. जडेजाने दुसऱ्या इनिंगमध्ये 23 रन केले. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सला सर्वाधिक 4 विकेट मिळाल्या, तर स्टुअर्ट ब्रॉड आणि मॅटी पॉट्स यांना 2-2 आणि अंडरसन-लीचला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडने चौथ्या इनिंगमध्ये 378 रनचा पाठलाग केला, तर टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातला त्यांचा हा सगळ्यात यशस्वी पाठलाग असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या नुकत्याच झालेल्या टेस्ट सीरिजमध्ये इंग्लंडने टी-20 स्टाईल क्रिकेट खेळत आक्रमक विजय मिळवले होते, त्यामुळे या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठीही ते त्याच आत्मविश्वासाने मैदानात उतरण्याची शक्यता आहे. चौथ्या दिवसाची सुरूवात भारताने 125/3 अशी केली होती, पण यानंतर टीम इंडियाने इंग्लंडला गिफ्ट म्हणून विकेट दिल्या. चेतेश्वर पुजारा शॉर्ट बॉलवर कट मारण्याच्या नादात पॉईंटमध्ये कॅच देऊन बसला, तर श्रेयस अय्यरने बाऊन्सरवर गरज नसलेला शॉट मारला. ऋषभ पंतही रिव्हर्स स्वीप खेळताना आऊट झाला. तर शार्दुल ठाकूरही बाऊन्सरवर हूक शॉट मारताना कॅच आऊट झाला. तिसऱ्या दिवशी भारतीय बॉलर्सनी इंग्लंडचा 284 रनवर ऑल आऊट केला, त्यामुळे टीमला 132 रनची आघाडी मिळाली. भारताकडून मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) 3 आणि मोहम्मद शमीला 2 विकेट मिळाल्या. शार्दुल ठाकूरला 1 विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) शतक केलं. त्याने 140 बॉलमध्ये 106 रनची खेळी केली, ज्यात 14 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. याशिवाय सॅम बिलिंग्सने 36, जो रूटने 31 आणि कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) 25 रन केले. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्या शतकाच्या मदतीने भारताने 416 रनपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून जेम्स अंडरसनला 5 आणि मॅटी पॉट्सला 2 विकेट मिळाल्या, याशिवाय ब्रॉड, स्टोक्स आणि रूट यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात मागच्या वर्षी 4 टेस्ट मॅच झाल्या होत्या, पण कोरोना व्हायरसमुळे पाचवी टेस्ट खेळवली गेली नाही. ही टेस्ट मॅच आता एजबॅस्टनमध्ये खेळवली जात आहे. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Pujara, Rishabh pant

    पुढील बातम्या