Home /News /sport /

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

IND vs ENG : पुजाराचं अर्धशतक, पंतची साथ, भारताला 257 रनची मोठी आघाडी

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची आघाडी आता 257 रनपर्यंत पोहोचली आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 50 तर ऋषभ पंत (Rishabh Pant) 30 रनवर नाबाद खेळत आहेत.

पुढे वाचा ...
    एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताचा (India vs England 5th Test) स्कोअर 125/3 एवढा झाला आहे, त्यामुळे टीम इंडियाची आघाडी आता 257 रनपर्यंत पोहोचली आहे. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 50 तर ऋषभ पंत (Rishabh Pant) 30 रनवर नाबाद खेळत आहेत. पुजाराने 139 बॉलमध्ये 5 फोर मारल्या आहेत. अंडरसन, ब्रॉड आणि स्टोक्स यांना प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं. दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाची सुरूवात खराब झाली. ओपनर शुभमन गिल 4 रनवर आऊट झाला, यानंतर विहारी 11 आणि विराट कोहली 20 रनवर माघारी परतले. मागच्या इनिंगमध्ये शतक करणाऱ्या ऋषभ पंतने या इनिंगमध्येही पुजारासोबत खिंड लढवली. त्याआधी तिसऱ्या दिवशी भारतीय बॉलर्सनी इंग्लंडचा 284 रनवर ऑल आऊट केला, त्यामुळे टीमला 132 रनची आघाडी मिळाली. भारताकडून मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) 3 आणि मोहम्मद शमीला 2 विकेट मिळाल्या. शार्दुल ठाकूरला 1 विकेट घेण्यात यश आलं. इंग्लंडकडून जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) शतक केलं. त्याने 140 बॉलमध्ये 106 रनची खेळी केली, ज्यात 14 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. याशिवाय सॅम बिलिंग्सने 36, जो रूटने 31 आणि कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) 25 रन केले. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांच्या शतकाच्या मदतीने भारताने 416 रनपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून जेम्स अंडरसनला 5 आणि मॅटी पॉट्सला 2 विकेट मिळाल्या, याशिवाय ब्रॉड, स्टोक्स आणि रूट यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात मागच्या वर्षी 4 टेस्ट मॅच झाल्या होत्या, पण कोरोना व्हायरसमुळे पाचवी टेस्ट खेळवली गेली नाही. ही टेस्ट मॅच आता एजबॅस्टनमध्ये खेळवली जात आहे. या सीरिजमध्ये टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: India vs england, Pujara, Rishabh pant

    पुढील बातम्या