Home /News /sport /

IND vs ENG : स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

IND vs ENG : स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यांनी इंग्लंडला चांगली सुरूवात करून दिली. शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) बेन स्टोक्सचा कॅच सोडला तेव्हा ही चूक भारताला चांगलीच महागात पडणार, असं वाटत होतं. शार्दुलनंतर कर्णधार जसप्रीत बुमराहनेही (Jasprit Bumrah) स्टोक्सचा कॅच सोडला.

पुढे वाचा ...
    एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) यांनी इंग्लंडला चांगली सुरूवात करून दिली. दोघांनीही जलद रन करून भारतीय बॉलर्सना दबावात आणलं. शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) बेन स्टोक्सचा कॅच सोडला तेव्हा ही चूक भारताला चांगलीच महागात पडणार, असं वाटत होतं. शार्दुलनंतर कर्णधार जसप्रीत बुमराहनेही (Jasprit Bumrah) स्टोक्सचा कॅच सोडला, त्यावेळी शार्दुल बॉलिंग करत होता, पण बुमराह आणि शार्दुलने लगेचच आपली ही चूक सुधारली. कर्णधार बेन स्टोक्स आणि जॉनी बेयरस्टो यांनी तिसऱ्या दिवशी जलद रन करायला सुरूवात केली. 5 ओव्हरमध्येच त्यांनी 84 रनवरून टीमचा स्कोअर 100 रनपर्यंत पोहोचवला. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या नॉटिंघम टेस्टसारखीच बॅटिंग करण्याच्या इराद्याने हे दोघं मैदानात उतरले होते. किवींविरुद्ध या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 121 बॉलमध्ये 179 रनची पार्टनरशीप केली आणि अशक्य आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. भारताविरुद्धही या दोघांनी अशाच बॅटिंगला सुरूवात केली होती. भारतीय फिल्डरनीही दोन जीवनदान देऊन स्टोक्सला मदत केली. 36 व्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर शार्दुल ठाकूरने स्टोक्सचा हातातला सोपा कॅच सोडला. यानंतरच्या पुढच्या बॉलवर बेयरस्टोने फोर मारून 50 रनची पार्टनरशीप पूर्ण केली. याच्या 2 ओव्हरनंतर पुन्हा एकदा स्टोक्सला जीवनदान मिळालं. यावेळी बॉलर शार्दुल ठाकूर होता तर कॅच कर्णधार जसप्रीत बुमराहने सोडला. शार्दुलच्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला स्टोक्सने पुढे येऊन मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण बॉल मिड ऑफला उभ्या असलेल्या बुमराहकडे गेला. हा कॅच पकडण्यात बुमराहला अपयश आलं. यानंतरच्या पुढच्याच बॉलला स्टोक्सने पुन्हा तीच चूक केली, यावेळी मात्र बुमराह सतर्क होता आणि त्याने कॅच पकडला. बेन स्टोक्स 36 बॉलमध्ये 25 रन करून आऊट झाला. तर बेयरस्टोने 140 बॉलमध्ये 106 रनची खेळी केली. बेयरस्टोने यात 14 फोर आणि 2 सिक्स ठोकले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ben stokes, India vs england, Jasprit bumrah, Shardul Thakur

    पुढील बातम्या