मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : 4 टेस्टमध्ये 3 अर्धशतकं, 'लॉर्ड' ठाकूरमुळे या स्टार खेळाडूचं करियर धोक्यात!

IND vs ENG : 4 टेस्टमध्ये 3 अर्धशतकं, 'लॉर्ड' ठाकूरमुळे या स्टार खेळाडूचं करियर धोक्यात!

चौथ्या टेस्टमध्ये शार्दुल चमकला

चौथ्या टेस्टमध्ये शार्दुल चमकला

इंग्लंड दौऱ्यामध्ये शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) टीम इंडियाचा हिरो म्हणून समोर आला आहे. चौथ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये (India vs England 4th Test) त्याने शानदार 57 रनची खेळी करत भारताला 190 रनपर्यंत पोहोचवलं.

  • Published by:  Shreyas

लंडन, 5 सप्टेंबर : इंग्लंड दौऱ्यामध्ये शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) टीम इंडियाचा हिरो म्हणून समोर आला आहे. चौथ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये (India vs England 4th Test) त्याने शानदार 57 रनची खेळी करत भारताला 190 रनपर्यंत पोहोचवलं. यानंतर दुसऱ्या इनिंगमध्येही तो 60 रन करून आऊट झाला. या सीरिजच्या एका टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये अर्धशतक करणारा शार्दुल पहिलाच भारतीय ठरला आहे. शार्दुल आणि पंत (Rishabh Pant) यांच्यात झालेल्या 100 रनच्या पार्टनरशीपमुळे भारताने इंग्लंडला विजयासाठी 368 रनचं आव्हान दिलं.

शार्दुल ठाकूर जेव्हा पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंगसाठी उतरला तेव्हा भारताचा स्कोअर 117 रनवर 6 विकेट एवढा होता. पण शार्दुलने 36 बॉलमध्ये आक्रमक 57 रन केले, यात 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. यानंतर बॉलिंगमध्येही शार्दुलला एक विकेट मिळाली. 81 रनची खेळी करणाऱ्या पोपला त्याने आऊट केलं.

शार्दुल ठाकूरने त्याच्या या कामगिरीमुळे भारताला ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) कमी जाणवू दिली नाही. कंबरेच्या दुखापतीमुळे हार्दिकची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली नाही. शार्दुलची ही कामगिरी बघता आता हार्दिकला टेस्ट क्रिकेटमध्ये लवकर संधी मिळण्याची शक्यताही कमी आहे.

दुसऱ्या इनिंगमध्ये शार्दुल जेव्हा बॅटिंगला उतरला तेव्हाही भारताची अवस्था बिकट होती. 312 रनवर भारताने 6 विकेट गमावल्या होत्या आणि आघाडी फक्त 213 रनची होती. ठाकूरने पंतसोबत शतकी पार्टनरशीप करत भारताचा स्कोअर 400 पर्यंत पोहोचवला. एवढच नाही तर भारताची आघाडीही 300 च्या पुढे गेली. 72 बॉलमध्ये ठाकूरने 60 रन केल्या, यात 7 फोर आणि एक सिक्सचा समावेश होता. तर पंतही 50 रन करून आऊट झाला.

आपल्या करियरमध्ये चौथी टेस्ट खेळणाऱ्या शार्दुलला सहाव्यांदा बॅटिंगची संधी मिळाली, यात त्याने तीनवेळा अर्धशतक केलं आहे. म्हणजे प्रत्येक दुसऱ्या इनिंगमध्ये शार्दुलला अर्धशतक करता आलं आहे. याशिवाय एका इनिंगमध्ये तो नाबाद राहिला. याआधी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये शार्दुलने 67 रन केले याशिवाय त्याने 7 विकेटही घेतल्या. पहिल्या इनिंगमध्ये पिछाडीवर पडल्यानंतरही भारताचा त्या मॅचमध्ये 3 विकेटने विजय झाला होता.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शार्दुलने 65 मॅचमध्ये 218 विकेट घेतल्या. तसंच त्याने 1327 रन केल्या यात 7 अर्धशतकं आहेत.

First published:

Tags: India vs england, Shardul Thakur