मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG 4th Test : खराब बॅटिंगनंतर टीम इंडियाचं जोरदार कमबॅक, इंग्लंडने गमावल्या 3 विकेट

IND vs ENG 4th Test : खराब बॅटिंगनंतर टीम इंडियाचं जोरदार कमबॅक, इंग्लंडने गमावल्या 3 विकेट

फोटो सौजन्य : बीसीसीआय

फोटो सौजन्य : बीसीसीआय

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs England 4th Test) पुनरागमन केलं आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर 53/3 एवढा आहे, त्यामुळे ते अजून 138 रननी पिछाडीवर आहे.

  • Published by:  Shreyas

लंडन, 2 सप्टेंबर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs England 4th Test) पुनरागमन केलं आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर 53/3 एवढा आहे, त्यामुळे ते अजून 138 रननी पिछाडीवर आहे. महत्त्वाचं म्हणजे या सीरिजमध्ये तीन शतकं करणारा जो रूट (Joe Root) माघारी परतला आहे. डेव्हिड मलान (David Malan) 26 रनवर आणि क्रेग ओव्हरटन 1 रनवर खेळत आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 2 तर उमेश यादवने (Umesh Yadav) रूटची महत्त्वाची विकेट घेतली. इंग्लंडचे ओपनर रोरी बर्न्स आणि हसीब हमीद स्वस्तात आऊट झाले.

त्याआधी टीम इंडियाची बॅटिंग पुन्हा गडगडली, पण शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) टीम इंडियाची लाज वाचवली . शार्दुल ठाकूरच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीमुळे भारताचा 191 रनवर ऑल आऊट झाला. शार्दुलने 36 बॉलमध्ये 57 रन केले, यामध्ये 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. शार्दुल ठाकूरने उमेश यादवसोबत 68 रनची पार्टनरशीप केली. भारताची अवस्था 127/7 अशी झाली होती, पण शार्दुलने इंग्लंडच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. 190 रनवर भारताने शार्दुलची विकेट गमावली. यानंतर पुढच्या दोन्ही बॅट्समनना फक्त एक रन काढता आली.

टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने या मॅचमध्ये पुन्हा निराशाजनक कामगिरी केली. कर्णधार विराट कोहली पुन्हा एकदा अर्धशतक करून आऊट झाला, तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे परत अपयशी ठरला. ऑफ स्टम्प बाहेरचा बॉल खेळण्याच्या नादात अजिंक्य रहाणेने विकेट गमावली. विराट कोहली 50 रनवर तर रहाणे 14 रन करून आऊट झाला.

39 रनवर टीम इंडियाचे सुरुवातीचे 3 बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये परतले. रोहित शर्मा (Rohit Sharma) 11 रनवर, केएल राहुल (KL Rahul) 17 रनवर आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 4 रनकरून आऊट झाला. सुरुवातीच्या 3 विकेट लवकर गेल्यानंतर टीम इंडियाने आश्चर्यकारकरित्या रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवलं, पण भारताची ही रणनिती यशस्वी झाली नाही. जडेजा 10 रनवर आऊट झाला.

इंग्लंडकडून क्रिस वोक्सने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर ओली रॉबिनसनला 3 विकेट मिळाल्या. जेम्स अंडरसन आणि क्रेग ओव्हरटनला प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडने या सामन्यासाठी टीममध्ये दोन बदल केले आहेत. जॉस बटलरऐवजी (Joss Buttler) ओली पोपचा (Ollie Pope) टीममध्ये समावेश करण्यात आला आहे, तर सॅम करनऐवजी (Sam Curran) क्रिस वोक्सला (Chris Woakes) संधी देण्यात आली आहे. तर भारतानेही या सामन्यात दोन बदल केले आहेत. मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) यांना दुखापतीमुळे बाहेर बसावं लागलं आहे. या दोघांच्याऐवजी शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) आणि उमेश यादव (Umesh Yadav) यांना संधी देण्यात आली आहे.

5 टेस्ट मॅचची ही सीरिज बरोबरीत आहे. ट्रेन्ट ब्रीजची पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाल्यानंतर लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय झाला. यानंतर इंग्लंडच्या टीमने धडाकेबाज पुनरागमन करत लीड्सवर झालेली तिसरी टेस्ट इनिंग आणि 76 रनने जिंकली.

लीड्सवर झालेल्या या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाचा फक्त 78 रनवर ऑल आऊट झाला. गेल्या काही काळापासून भारताची मिडल ऑर्डर संघर्ष करत आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांना मागच्या दोन वर्षात एकही शतक करता आलं नाही. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्येही हे रेकॉर्ड कायम राहिलं.

भारतीय टीम

रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

इंग्लंडची टीम

रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट, ओली पोप, जॉनी बेयरस्टो, मोईन अली, क्रिस वोक्स, क्रेग ओव्हरटन, ओली रॉबिनसन, जेम्स अंडरसन

First published:

Tags: India vs england, Joe root, Virat kohli