मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IND vs ENG : अंडरसनचा बदला घेणं इंग्लंडला पडलं महागात, आपल्याच खेळाडूने केली पोलखोल

IND vs ENG : अंडरसनचा बदला घेणं इंग्लंडला पडलं महागात, आपल्याच खेळाडूने केली पोलखोल

इंग्लंडवर उलटली रणनिती

इंग्लंडवर उलटली रणनिती

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs England 2nd Test) धमाक्यात पुनरागमन केलं आणि इंग्लंडच्या हातातून विजय खेचून घेतला. लॉर्ड्सवर झालेल्या या टेस्टमध्ये भारताचा 151 रनने विजय झाला. इंग्लंडचा माजी खेळाडू स्टीव्ह हार्मिनसने (Steve Harminson) मात्र इंग्लंडची ही रणनिती त्यांच्यावरच उलटल्याचं मत मांडलं आहे.

पुढे वाचा ...

लंडन, 16 ऑगस्ट : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (India vs England 2nd Test) धमाक्यात पुनरागमन केलं आणि इंग्लंडच्या हातातून विजय खेचून घेतला. लॉर्ड्सवर झालेल्या या टेस्टमध्ये भारताचा 151 रनने विजय झाला. इंग्लंडचा माजी खेळाडू स्टीव्ह हार्मिनसने (Steve Harminson) मात्र इंग्लंडची ही रणनिती त्यांच्यावरच उलटल्याचं मत मांडलं आहे. जेम्स अंडरसनचा (James Anderson) बदला घेण्याच्या नादात इंग्लंडची लय खराब झाल्याचं हार्मिनसन म्हणाला. इंग्लंडच्या रणनितीमुळे बुमराह आणि शमीला क्रीजवर टिकणं सोपं झालं, असं वक्तव्यही हार्मिनसनने केलं.

मोहम्मद शमीने (Mohammad Shami) नाबाद 56 रन आणि बुमराहने (Jasprit Bumrah) नाबाद 34 रनची खेळी केली. या दोघांमध्ये 9व्या विकेटसाठी नाबाद 89 रनची पार्टनरशीप झाली, यानंतर भारताने 298/8 वर डाव घोषित केला. पहिल्या इनिंगमध्ये 5 विकेट घेणाऱ्या अंडरसनला दुसऱ्या इनिंगमध्ये एकही विकेट घेता आली नाही.

हार्मिनसनने पाचव्या दिवशी इंग्लंडने अवलंबलेल्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'इंग्लंडच्या खेळाडूंनी लय गमावली. ऋषभ पंतची (Rishabh Pant) विकेट घेतल्यानंतर इंग्लंडला काय झालं. 9वी आणि 10वी विकेट घेण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीच स्लिप नव्हती. कोणत्याही स्थितीमध्ये कॅच मिळाला नाही. जेव्हा शाब्दिक चकमक सुरू होती, तेव्हा चांगलं मनोरंजन सुरू होतं. बुमराहला बाऊन्सर टाकून आऊट करण्याची रणनिती त्यांच्यावरच उलटली. भारताने जबरदस्त खेळ दाखवला,' असं हार्मिनसन म्हणाला.

'अंडरसनसाठी उभं राहण्याची गरज नव्हती, कारण त्याने 160 पेक्षा जास्त मॅच खेळल्या आहेत. बाऊंड्रीवर सहा फिल्डर असतील आणि आम्ही बुमराहला बाऊन्सर टाकू हे त्यांनी ठरवून टाकलं होतं. तुम्ही टेस्ट क्रिकेटच्या भावनांमध्ये अडकलात. कधी कधी तुम्हाला मागे हटावं लागतं. 160 टेस्ट खेळलेल्या अंडरसनसाठी तुम्ही उभे राहिलात. तो एकटाच खूप आहे. तो मोठा खेळाडू आहे,' असं वक्तव्य हार्मिनसनने केलं.

खेळाच्या पाचव्या दिवशी इंग्लंडच्या खेळाडूंनी जसप्रीत बुमराहवर (Jasprit Bumrah) निशाणा साधला. बुमराहविषयी इंग्लंडच्या खेळाडूंनी अपशब्द वापरल्यानंतर भारतीय खेळाडूही भडकले, यानंतर बुमराह आणि बटलरमध्ये (Jos Butller) बाचाबाची झाली. अखेर अंपायरना मध्ये पडावं लागलं. बुमराह इंग्लंडच्या खेळाडूंशी पंगा घेत असल्याचं पाहून ड्रेसिंग रूममध्ये असलेला कर्णधार विराट कोहलीही (Virat Kohli) आक्रमक झाला. लॉर्ड्सच्या ड्रेसिंग रूममधून विराट कोहलीने शिव्या दिल्या आणि जोरजोरात टाळ्याही वाजवल्या.

कसा सुरू झाला वाद?

तिसऱ्या दिवशी बुमराह आणि जेम्स अंडरसन (James Anderson) यांच्यामध्ये झालेल्या बाचाबाचीनंतर या वादाला सुरुवात झाली. बुमराहने अंडरसनवर बाऊन्सरचा पाऊस पाडला. यातले काही बॉल अंडरसनच्या शरिरावरही लागले. अखेर मोहम्मद शमीने अंडरसनला बोल्ड केलं. आऊट झाल्यानंतर निराश झालेला अंडरसन भारतीय खेळाडूंना काहीतरी बोलला. यानंतर चौथ्या दिवशीही विराट आणि अंडरसन यांच्यात वाद झाले आणि पाचव्या दिवशीही हा पंगा सुरूच राहिला.

First published:

Tags: India vs england, James anderson