• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs ENG : 'तुम्ही मला यासाठी मारू शकता', आकाश चोप्राला वाटतेय भीती

IND vs ENG : 'तुम्ही मला यासाठी मारू शकता', आकाश चोप्राला वाटतेय भीती

लॉर्ड्स टेस्टबाबत आकाश चोप्राचं भाकीत

लॉर्ड्स टेस्टबाबत आकाश चोप्राचं भाकीत

भारत आणि इंग्लंड (India vs England 2nd Test) यांच्यात लॉर्ड्सवर सुरू असलेल्या टेस्ट मॅचचा आजचा अखेरचा दिवस आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) रुपात पहिला धक्का लागला, त्यामुळे टीमचं टेन्शन आणखी वाढलं.

 • Share this:
  मुंबई, 16 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England 2nd Test) यांच्यात लॉर्ड्सवर सुरू असलेल्या टेस्ट मॅचचा आजचा अखेरचा दिवस आहे. दिवसाच्या सुरुवातीलाच भारताला ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) रुपात पहिला धक्का लागला, त्यामुळे टीमचं टेन्शन आणखी वाढलं. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्यामते या मॅचमध्ये इंग्लंडचं पारडं जड आहे. आकाश चोप्रा त्याच्या युट्यूब चॅनलवर बोलात होता. 'तुम्ही यासाठी मला जीवे मारू शकता, पण मला वाटतं ही मॅच इंग्लंड जिंकले. कारण खेळपट्टी संथ झाली आहे, पण तुटलेली नाही. काही बॉल खाली बसत आहेत, पण यामुळे बॅट्समनना त्रास होण्याची शक्यता कमी आहे,' असं आकाश चोप्रा म्हणाला. शेवटच्या दिवशी भारतीय टीम 20 ओव्हरपेक्षा जास्त टिकणार नाही आणि जवळपास 190 रनची आघाडी भारताला मिळेल. जेम्स अंडरसन (James Anderson) नव्या बॉलने भारताच्या तळाच्या बॅट्समनना त्रास देईल, शेवटच्या 4 पैकी 2 विकेट अंडरसनलाच मिळतील, असं भाकीत आकाश चोप्राने केलं. भारतासाठी अखेरच्या दिवशी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ट्रम्प कार्ड ठरू शकतो, त्याला 2 पेक्षा जास्त विकेट मिळतील. बुमराह पाचव्या दिवशी टीम इंडियाचं नशीब बदलण्याचा प्रयत्न करेल, कारण धीम्या आणि असमान उसळी असणाऱ्या खेळपट्टीवर तो कमाल दाखवू शकतो, अशी प्रतिक्रिया आकाश चोप्राने दिली. भारताने तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा 391 रनवर ऑल आऊट केल्यानंतर चौथ्या दिवशी पुन्हा बॅटिंगला सुरुवात केली. सुरुवातीच्या 3 विकेट लवकर गेल्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यात शतकी पार्टनरशीप झाली. रहाणे अर्धशतक करून आऊट झाला, पण पुजाराचं अर्धशतक हुकलं.
  Published by:Shreyas
  First published: