पोटचेफ़्स्टरूम, 09 फेब्रुवारी : चांगल्या सुरुवातीनंतर बांगलादेशला धक्का देण्यात भारतीय गोलंदाज (India U19 vs Bangladesh U19) यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे बिनबाद 50 धावा केलेल्या बांगलादेशची अवस्था 32.5 ओव्हरमध्ये 7 बाद 143 धावा अशी झाली आहे. धारधार गोलंदाजीमुळे सामन्यात पुन्हा भारताचं कमबॅक झालं आहे. भारताने दिलेल्या 178 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. बांगलादेशी सलामीवीरांनी फटकेबाजी करत संघाला अर्धशतक गाठून दिलं. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. त्यामुळे 50 धावापर्यंत एकही विकेट न गेलेल्या बांगलादेशची अवस्था नंतर 7 बाद 143 अशी झाली आहे. विकेटकीपर धृव जुरेलने चपळाई दाखवत बांगलादेशच्या शहादत हुसैनचं स्टंम्पिंग केलं. हे स्टंम्पिंग पाहून अनेकांना भारताचा दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीची आठवण आली. कारण धोनीनेही अनेकदा प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना काही कळण्याआधीच स्टंपमागे आपली करामत दाखवली आहे.
4 wickets in 5 overs. Ravi Bishnoi on fire 🔥🔥🔥 Impressive wicket-keeping by Dhruv Jurel. Come on guys 🙌👏💪 #INDvBAN #U19CWCFinal pic.twitter.com/8V0lqRmMGP
— Sir Jadeja fan (@SirJadeja) February 9, 2020
दरम्यान, आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशसमोर 177 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात सलामीवीर यशस्वी जयस्वाल वगळता भारताच्या इतर कोणत्याही फलंदाजाला कमाल करता आली नाही. त्यामुळे भारताचा डाव 47.2 ओव्हर्समध्ये सर्वबाद 177 धावांवर आटोपला. सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत 88 धावा फटकावल्या. मात्र त्याला दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. परिणामी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशसमोर धावांचं मोठं आव्हान ठेवण्यात भारतीय संघाला अपयश आलं.