पोटचेफ़्स्टरूम, 09 फेब्रुवारी : आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्यात भारताला पराभूत करत बांगलादेशच्या संघाने (Ind Vs Ban Final ) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयासाह बांगलादेशने इतिहासात पहिल्यांदाच अंडर19 वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगलादेशसमोर 178 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. बांगलादेशी सलामीवीरांनी फटकेबाजी करत संघाला अर्धशतक गाठून दिलं. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. त्यामुळे 50 धावापर्यंत एकही विकेट न गेलेल्या बांगलादेशची अवस्था नंतर 7 बाद 143 अशी झाली. मात्र नंतर पुन्हा आठव्या विकेटसाठी झालेल्या भागीदारीने बांगलादेशने सामन्यात कमबॅक करत भारतावर तीन विकेट्सने विजय मिळवला आणि वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. दरम्यान, या महत्त्वपूर्ण सामन्यात सलामीवीर यशस्वी जयस्वाल वगळता भारताच्या इतर कोणत्याही फलंदाजाला कमाल करता आली नाही. त्यामुळे भारताचा डाव 47.2 ओव्हर्समध्ये सर्वबाद 177 धावांवर आटोपला.
#U19CWCFinal Bangladesh wins by 3 wickets against India. pic.twitter.com/ctrKOW8Ogw
— ANI (@ANI) February 9, 2020
सलामीवीर यशस्वी जयस्वाल याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत 88 धावा फटकावल्या. मात्र त्याला दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. परिणामी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेशसमोर धावांचं मोठं आव्हान ठेवण्यात भारतीय संघाला अपयश आलं. तत्पूर्वी, सामन्यात बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आतापर्यंत पाच जेतेपदावर नाव कोरलेली टीम इंडिया आज प्रियम गर्ग याच्या नेतृत्वात मैदानात उतरली. विश्वचषकात भारताने अद्याप एकही सामना गमावला नव्हता. सामन्याला सुरुवात झाल्यानंतर भारताला मोठा धक्का बसला. दिव्यांश सक्सेना लवकरच बाद झाला. षटकातील चौथ्या बॉलवर सक्सेनाने महमुदुल हसनला झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 17 चेंडूत 2 धावा काढून तो बाद झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वालने एक बाजू लावून धरलेली असताना दुसऱ्या बाजूने मात्र भारतीय फलंदाज मैदानावर तग धरू शकले नाहीत.
India 🇮🇳 v Bangladesh 🇧🇩 #U19CWC final 🏆
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 9, 2020
Are. You. Ready?#INDvBAN | #FutureStars pic.twitter.com/t7uFYTmfxo
बांगलादेशचे अकरा खेळाडू - परवेज हुसेन, तनजीद हसन, महमुद्दलाह हसन जॉय, ताउहिद हृद्य, शाहदत हुसेन, अविशेक दास, अकबर अली, शमीम हुसेन, रकीबुल हसन, शोरीफुल इस्लाम आणि तनजीम हसन शकीब भारताचे अकरा खेळाडू - यशस्वी जायसवाल, दिव्यांश सक्सेना, तिलक वर्मा, प्रियम गर्ग, ध्रुव जुरेल, सिद्धेश वीर, अथर्व अंकोलेकर, रवि बिश्नोई, शाश्वत रावत, कार्तिक त्यागी, आकाश सिंह
All the best to the U19 🇮🇳 Cricket Team for the U19 @cricketworldcup Final!
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 9, 2020
Hope you'll continue the stellar team performance & win this for India.#U19CWC #FutureStars #INDvBAN