मुंबई, 19 फेब्रुवारी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्ली येथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना खेळवला जात आहे. या सामन्याचा आज तिसरा दिवस असून आजच्या सामन्यात कोण आघाडी घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
काल सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दिलेले आव्हान पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला होता. मात्र यावेळी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांसमोर भारताच्या फलंदाजीचा डाव बिघडला. एक एक करून सर्व फलंदाज बाद होत असताना भारताचा स्टार फलंदाज अक्षर पटेल याने मैदानात उभं राहून भारताचा डाव सावरला. त्याने 74 धावांचे मोलाचे योगदान दिले. अश्विनने 37 तर विराट कोहलीने 44 धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात अवघ्या 1 धावेची आघाडी मिळाली. यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर उस्मान ख्वाजा ला जडेजाने 6 धावांवर बाद केले. मात्र त्यानंतर वॉर्नरच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या ट्रॅव्हिस हेडने नाबाद 39 धावा केल्या. त्याला मार्नस लाबुशानेने नाबाद 16 धावा करत चांगली साथ दिली. दुसरा दिवस संपला त्यावेळी ऑस्ट्रेलियाने 1 बाद 61 धावा करत 62 धावांची आघाडी घेतली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs Australia, Test cricket