मुंबई, 16 मार्च : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. कसोटी मालिकेत विजयानंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिकेतही विजयी सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर ऑस्ट्रेलियाच्या संघासमोर भारताला घरच्या मैदानावर पराभूत करण्याचं आव्हान असेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा काही कारणांनी खेळू शकणार नाही. त्याच्या जागी हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापासून रोहित शर्मासंघात परतेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला एकदिवसीय सामना १७ मार्च रोजी होणार आहे. भारताचे 5 क्रिकेटर ज्यांनी परदेशी तरुणींसोबत थाटला संसार वानखेडे स्टेडियमवर दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सामना सुरू होईल. या सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग डिज्नी हॉटस्टारवर पाहता येईल. पहिल्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल. याशिवाय डीडी स्पोर्ट्सवरही सामना पाहता येईल. भारतीय संघ - रोहित शर्मा, युझवेंद्र चहल, इशान किशन, रविंद्र जडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकुर, उमरान मलिक, जयदेव उनादकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव. ऑस्ट्रेलिया - स्टिव्ह स्मिथ, सीन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स कॅरी, कॅमरून ग्रीन, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिश, मार्नस लॅब्युशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झे रिचर्ड्सन, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वॉर्नर, एडम झाम्पा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.