मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /क्रिकेटच्या इतिहासातल्या वर्णद्वेषी घटना, 'जंटलमन्स गेम'वर झाली चिखलफेक

क्रिकेटच्या इतिहासातल्या वर्णद्वेषी घटना, 'जंटलमन्स गेम'वर झाली चिखलफेक

इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिनसन (Ollie Robinson) याच्यावर वर्णद्वेषी ट्वीट केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. चौकशी होईपर्यंत रॉबिनसनचं निलंबन करण्यात आलं आहे.

इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिनसन (Ollie Robinson) याच्यावर वर्णद्वेषी ट्वीट केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. चौकशी होईपर्यंत रॉबिनसनचं निलंबन करण्यात आलं आहे.

इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिनसन (Ollie Robinson) याच्यावर वर्णद्वेषी ट्वीट केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. चौकशी होईपर्यंत रॉबिनसनचं निलंबन करण्यात आलं आहे.

मुंबई, 8 जून : इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिनसन (Ollie Robinson) याच्यावर वर्णद्वेषी ट्वीट केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. चौकशी होईपर्यंत रॉबिनसनचं निलंबन करण्यात आलं आहे. 8-9 वर्षांपूर्वी केलेल्या ट्वीटची किंमत रॉबिनसनला त्याच्या पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर चुकवावी लागली आहे. पण क्रिकेटच्या इतिहासात घडलेली ही काही पहिली घटना आहे, याआधीही अनेकवेळा वर्णद्वेषी टीका झाल्यामुळे जंटलमन्स गेमवर चिखलफेक झाली आहे.

- वेस्ट इंडिजचे महान खेळाडू कॉलीन क्रॉफ्ट (Collin Croft) यांना 1983 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ट्रेनमधून खाली फेकून देण्यात आलं. कॉलीन क्रॉफ्ट केपटाऊनमध्ये श्वेतवर्णीयांच्या ट्रेनमध्ये चढले होते, त्यामुळे त्यांना बाहेर फेकण्यात आलं. या घटनेमुळे दक्षिण आफ्रिकन सरकारची प्रतिमा खराब झाली, कारण त्यांनीच आपली प्रतिमा सुधारण्यासाठी वेस्ट इंडिज-दक्षिण आफ्रिका सीरिजचं आयोजन केलं होतं. या घटनेला महात्मा गांधींशीही जोडलं गेलं, कारण त्यांनाही दक्षिण आफ्रिकेच्या पीटरमॅरिट्सबर्गमध्ये रंगामुळे ट्रेनमधून बाहेर काढण्यात आलं होतं.

- 2008 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हरभजन सिंगवरही (Harbhajan Singh) वर्णद्वेषी टीकेचे आरोप झाले, पण पुढे ते अयोग्य सिद्ध झाले. सिडनी टेस्टदरम्यान हरभजन आपल्याला मंकी (माकड) म्हणाल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाच्या एन्ड्रयू सायमंड्सने (Andrew Symonds) केला. यानंतर मॅच रेफ्री माईक प्रॉक्टर (Mike Proctor) यांनी हरभजनवर 3 मॅचची बंदी घातली. या वादामुळे भारताने ऑस्ट्रेलिया दौरा रद्द करण्याचीही धमकी दिली. हरभजनचा बचाव करण्यासाठी सचिन तेंडुलकर पुढे आला. मॅच रेफ्रीने नंतर आपला निर्णय बदलला आणि हरभजन सिंगवरचे वर्णद्वेषी आरोप हटवण्यात आले.

- 2006 साली दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू हाशीम आमला (Hashim Amla) याच्यावरही वर्णद्वेषी टीका करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स (Dean Jones) कॉमेंट्री करताना आमलाला दहशतवादी म्हणाले होते. श्रीलंकेविरुद्धच्या टेस्टमध्ये आमलाने संगकाराचा उत्कृष्ट कॅच घेतला होता. यानंतर दहशतवादी आमलाने कॅच पकडल्याचं जोन्स कॉमेंट्री करताना म्हणाले होते. या टिप्पणीनंतर त्यांना कॉमेंट्री पॅनलमधून हटवण्यात आलं, पुढे त्यांना माफीही मागावी लागली.

- 2015 साली ऍशेस सीरिजदरम्यान इंग्लंडचा ऑलराऊंडर मोईन अलीने (Moeen Ali) ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर वर्णद्वेष केल्याचे आरोप केले होते. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आपल्याला ओसामा म्हणाला होता, असा दावा मोईन अलीने केला, पण त्याने ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूचं नाव सांगितलं नाही. मोईन अलीने ही घटना आपल्या करियरमधली सगळ्यात दुर्दैवी असल्याचं सांगितलं.

- पाकिस्तानचा माजी ऑलराऊंडर सरफराज अहमदने (Sarfaraz Ahmed) दक्षिण आफ्रिकेच्या एंडिले फेहलुक्वायोवर वर्णद्वेषी टीका केली होती. सरफराजचा आवाज कॅमेरामध्ये कैद झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. विकेट कीपिंग करत असताना सरफराज फेहलुक्वायोला काळा म्हणाला होता.

- पाकिस्तानचाच अहमद शहजाद (Ahmed Shahajad) श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानला (Tilakratne Dilshan) दिलेल्या वादग्रस्त सल्ल्यामुळे अडचणीत आला होता. मुस्लिम धर्म स्वीकारलास तर स्वर्गात जाशील, असं अहमद शहजाद दिलशानला म्हणाला होता. दिलशानने शहजादच्या या वक्तव्याला विरोध दर्शवल्यानंतर मग आगीसाठी तयार राहा, असं अहमद म्हणाला होता.

- वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी (Daren Sammy) यानेही आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळताना आपल्याला वर्णद्वेषी नावाने बोललं जायचं, असा धक्कादायक खुलासा केला होता. सॅमीने कोणत्याही क्रिकेटपटूचं नाव घेतलं नव्हतं, पण त्याच्या या दाव्यानंतर इशांत शर्माचं (Ishant Sharma) जुनी इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल झाली होती. या फोटोमध्ये इशांतने सॅमीचा उल्लेख काळू असा केला होता.

- टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फिल्डिंगसाठी बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या मोहम्मद सिराजलाही (Mohammad Siraj) वर्णद्वेषी टीकेला सामोरं जावं लागलं होतं. प्रेक्षकांमधून कोणीतरी आपल्यावर वर्णद्वेषी टीका केल्याचा आरोप सिराजने केला होता, यानंतर काही काळ सामनाही थांबवण्यात आला होता. टीम इंडियाने या प्रकरणाची अधिकृत तक्रारही दाखल केली होती.

First published:
top videos

    Tags: Cricket, England, Racism