मेलबर्न, 08 मार्च : आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होत आहे. प्रथम गोलंदाजी करत भारतानं खराब सुरुवात केली. त्यामुळं ऑस्ट्रेलियाने भारतासमोर तब्बल 185 धावांचे आव्हान ठेवले. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा झटका बसला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या तीन ओव्हरमध्येच भारताने 3 विकेट गमावल्या. तर, भारताची एक खेळाडू रिटायर्ड हर्ट झाली. हा अपघात भारताची यष्टीरक्षक फलंदाज तानिया भाटियासोबत घडला. दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर तानिया भाटिया स्वीप खेळण्याच्या नादात तिच्या डोक्याला बाउन्सर लागला. तानिया भाटियाच्या हेल्मेटला लागलेल्या चेंडूमुळे तीला मैदानातच चक्कर आली. यामुळे तानियाला मैदान सोडावे लागले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 185 धावांचे आव्हान ठेवले आहे. भारताच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे ऑस्ट्रेलियानं 184 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारताला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला. शेफाली वर्मा फक्त दोन धावांवर बाद झाली. संपूर्ण स्पर्धेत फॉर्ममध्ये असलेल्या शेफाली वर्मावरच भारतीय फलंदाजीची मदार होती. त्यानंतर तानिया भाटिया रिटायर्ड हर्ट झाली तर जेमिमाह शून्यावर बाद झाली. त्यामुळे भारताची अवस्था 2 बाद 8 अशी झाली. त्यानंतर स्मृती मानधनाही 11 धावांवर झेलबाद झाली. भारताला सगळ्यात मोठा झटका हरमनप्रीत कौर 4 धावांवर बाद झाली आहे. प्रथम गोलंदाजी करताना भारताने दीप्ती शर्माच्या तिसऱ्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर शेफाली वर्माने खतरनाक अशा एलिसा हिलीचा झेल सोडला. शेफालीने सोपा कॅच सोडल्यानंतर हिलीने याचा फायदा घेतला. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये राजेश्वरी गायकवाडने बेथ मूनीचा कॅच सोडला. त्यामुळं भारतानं पहिल्या 24 ओव्हरमध्ये दोन्ही सलामीवीरांना जीवनदान दिले. अखेर राधा यादवने 75 धावांवर एलिसाला बाद करत ही भागीदारी मोडली. त्यानंतर लगेचच बेथ मूनीने 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दीप्ती शर्माने कर्णधार लॅनिंग आणि अॅश्ले गार्डनर यांना एकाच ओव्हरमध्ये माघारी धाडले. तर 19व्या ओव्हरमध्ये पूनम यादवने रॅचेल हेन्सला बाद केले. त्यामुळं ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.