जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / IND vs PAK : चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारत-पाकिस्तान सामना होणार नाही रद्द पण...

IND vs PAK : चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारत-पाकिस्तान सामना होणार नाही रद्द पण...

IND vs PAK : चाहत्यांसाठी मोठी बातमी, भारत-पाकिस्तान सामना होणार नाही रद्द पण...

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत चार सामने पावसामुळं रद्द झाले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मॅंचेस्टर, 16 जून : ICC Cricket World Cupच्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते भारत-पाकिस्तान सामन्यावर. मात्र, असे असले तरी, सध्या जगभरातील क्रिकेट चाहत्यांसाठी मॅंचेस्टरमधील हवामान महत्त्वाचे आहे. कारण याच शहरातील ओल्ड ट्रैफर्ड मैदानावर आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. याआधी वर्ल्ड कपमध्ये पावसामुळं तब्बल चार सामने रद्द झाले आहेत. यात भारत-न्यूझीलंड यांच्यातील सामन्याचाही समावेश आहे. त्यामुळं चाहत्यांना आजचा हायवोल्टेज सामना रद्द व्हावा अशी इच्छा नाही आहे. सध्या मॅंचेस्टरमध्ये आकाश निरभ्र असून, सामना रद्द होणार नाही असे वाटत असले तरी पावसाची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या एक-दोन दिवसात मॅचेस्टरमध्ये पावसाच्या सरी आल्या होत्या. त्यामुळं भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना वेळेवर सुरु होण्याची शक्यता आहे. अडीच वाजता नाणेफेक होईल, त्यानंतर तीन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र, संध्याकाळच्या सुमारास पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    जाहिरात

    मशीननं सुखवले जात आहे मैदान भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर त्याचा सगळ्यात जास्त फटका हा आयसीसीला बसणार आहे. त्यामुळं हा सामना होईल याची दक्षता आयसीसीकडून घेण्यात येत आहे. सध्या ग्राऊंण्ड स्टाफ मैदान साफ करत आहेत. कृत्रीमरित्या मैदान सुखे कसे राहिल याची काळजी घेतली जात आहे.

    सामना सुरु होईल पण… भारत-पाकिस्तान सामना वेळेवर सुरु होणार आहे. मात्र हा सामना 50 षटकांचा होणार की नाही हे अद्याप निश्चित नाही. कारण सायंकाळी 5-7च्या सुमारास पावसाची शक्यता आहे. शनिवारी सतत होणाऱ्या पावसामुळं दोन्ही संघांना सराव करता आला नाही. मात्र, हा सामना सुरुवळीत पार पडावा यासाठी जगभरातून देवाला साकडे घातले जात आहे. World Cup: मैदानात IND VS PAK महामुकाबला, भारतीय संघाला अशा दिल्या शुभेच्छा

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात