साउथॅम्पटन, 05 जून : इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरू झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात भारतीय गोलंदाजांना बल्ले बल्ले करत आफ्रिकेच्या फलंदाजांना नाचवलं. पहिल्या दहा षटकात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने तर त्यानंतरच्या 10 षटकात युझवेंद्र चहलने आफ्रिकन फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. भारताची वर्ल्ड कपमधील ही पहिली लढत साउथॅम्पटन इथल्या रोज बाउल क्रिकेट ग्राउंडवर होत आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय आफ्रिकेला महागात पडला. भारताच्या वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही गोलंदाजांनी आफ्रिकेला दणका दिला.
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या आफ्रिकेच्या सलामीवीरांना बुमराहनं आपल्या तीन षटकांत माघारी धाडलं. हाशिम अमला 6 धावांवर बाद झाला. तर, क्विंटन डीकॉक 10 धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी करणाऱी जोडी युझवेंद्र चहलनं फोडली. त्यानं पहिल्यांदा डु प्लेसी आणि नंतर रॉसी वान डेर डुसेनला बाद केलं.
भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलनं टाकलेल्या चेंडूनं आफ्रिकेच्या डुसेनला असं चकवलं की सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. डुसेनची विकेट घेणारा चहलचा हा चेंडू ‘बॉल ऑफ द सेंच्युरी’ असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. डुसेनने फिरकीपटू चहलच्या पहिल्याच चेंडूवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅटला चकवा देऊन चेंडू थेट मधल्या यष्टीवर आदळला. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज वान डेरर डुसेनला एकदिवसीय क्रिकेटमध्ये बाद करणारा युझवेंद्र चहल हा दुसरा फिरकीपटू आहे. त्याने या विकेटच्या आधी लेग स्पिनर्सविरुद्ध 103 चेंडूत 65 धावा केल्या आहेत. भारताने या सामन्यात दोन फिरकीपटूंना संघात घेतलं आहे. पण गेल्या 20 वर्षांत या मैदानावर फिरकीपटूंची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. इंग्लंडमधील मैदानांवर फिरकीपटूंपेक्षा वेगवान गोलंदाजांनी जास्त यश मिळवलं आहे. त्या तुलने फिरकी गोलंदाजीला इथलं वातावरण अनुकूल नाही. या परिस्थितीतही भारताचे फिरकीपटू युझवेंद्र चहलने 4 तर चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने 1 विकेट घेतली. SPECIAL REPORT: वर्ल्ड कपदरम्यान चॅम्पियन धोनीच्या जिवाला धोका

)







