मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /श्रीलंकेचा सनथ भ्रष्टाचारात अडकला, क्रीडा मंत्र्यांनाच ऑफर केली लाच

श्रीलंकेचा सनथ भ्रष्टाचारात अडकला, क्रीडा मंत्र्यांनाच ऑफर केली लाच

श्रीलंका क्रिकेटमध्ये (Sri Lanka Cricket) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या प्रकरणाने डोकं वर काढलं आहे. श्रीलंका क्रिकेटचे माजी प्रदर्शन विश्लेषक सनथ जयसुंदरा (Sanath Jayasundara) याच्यावर क्रीडा मंत्र्यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...

कोलंबो, 6 जुलै: श्रीलंका क्रिकेटमध्ये (Sri Lanka Cricket) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या प्रकरणाने डोकं वर काढलं आहे. श्रीलंका क्रिकेटचे माजी प्रदर्शन विश्लेषक सनथ जयसुंदरा (Sanath Jayasundara) याच्यावर क्रीडा मंत्र्यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीच्या (ICC) भ्रष्टाचारविरोधी संहितेचं उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सनथने 2019 साली श्रीलंका ए दौऱ्यात निवड प्रभावित करण्यासाठी क्रीडा मंत्र्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला, याप्रकरणी सनथ दोषी आढळला.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार 'सनथ जयसुंदराला आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी समितीने दोषी ठरवलं आहे, यानंतर त्याच्यावर सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सहभागी होण्यासाठी 7 वर्षांची बंदी घातली आहे. सनथला 11 मे 2019 पासून निलंबित करण्यात आलं होतं, तेव्हापासून ही बंदी लागू होईल.'

सनथसोबत आणखी दोन जणंही दोषी आढळले आहेत. या सगळ्यांनी टीम निवड, मॅचचा निकाल, संचालन या गोष्टी प्रभावित करण्यासाठी क्रीडा मंत्र्यांना लाच ऑफर केली.

आम्ही क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. आमची टीम असे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करत आहे, असं आयसीसीच्या आचरण समितीचे महाप्रबंधक एलेक्स मार्शल यांनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Cricket, Icc, Sri lanka