मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /इंग्लंडच्या खेळाडूंना 'कोरोना', हर्षा भोगलेंच्या ट्वीटमुळे नवा वाद

इंग्लंडच्या खेळाडूंना 'कोरोना', हर्षा भोगलेंच्या ट्वीटमुळे नवा वाद

कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) क्रिकेट आधीसारखं राहिलं नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजआधी इंग्लंड (England Cricket Team) टीममधल्या 7 जणांना कोरोनाची लागण झाली. भारतीय कॉमेंटेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनीही यावर चिंता व्यक्त केली.

कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) क्रिकेट आधीसारखं राहिलं नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजआधी इंग्लंड (England Cricket Team) टीममधल्या 7 जणांना कोरोनाची लागण झाली. भारतीय कॉमेंटेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनीही यावर चिंता व्यक्त केली.

कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) क्रिकेट आधीसारखं राहिलं नाही. पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजआधी इंग्लंड (England Cricket Team) टीममधल्या 7 जणांना कोरोनाची लागण झाली. भारतीय कॉमेंटेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनीही यावर चिंता व्यक्त केली.

पुढे वाचा ...

मुंबई, 7 जुलै : कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) क्रिकेट आधीसारखं राहिलं नाही. या व्हायरसमुळे मागच्या वर्षी होणारा टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) रद्द करण्यात आला, याशिवाय अनेक सीरिजही कोरोनामुळे खेळवता आल्या नाहीत. दीड वर्षानंतरही या व्हायरसचा खेळावर अजूनही परिणाम होत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजआधी इंग्लंड (England Cricket Team) टीममधल्या 7 जणांना कोरोनाची लागण झाली, यातले 3 खेळाडू आणि 4 सपोर्ट स्टाफचे सदस्य आहेत. खेळाडूंना कोरोना झाल्यानंतर इंग्लंड बोर्डने नव्या टीमची घोषणा केली.

खेळाडू आधीच बायो-बबलमध्ये असताना त्यांना कोरोना कसा झाला? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बायो-बबलमध्ये कठोर नियमांचं पालन करावं लागतं, तरीही टीममध्ये व्हायरसने शिरकाव केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. भारतीय कॉमेंटेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनीही यावर चिंता व्यक्त केली.

'हा व्हायरस कुठेही जाणार नाही. चायनीज व्हायरसने आता इंग्लंड क्रिकेट टीममध्ये घुसखोरी केली. बायो-बबलचे नियम आता आणखी कठोर होतील. दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही,' असं ट्वीट हर्षा भोगले यांनी केलं.

हर्षा भोगले यांनी कोरोनाचा उल्लेख चायनीज व्हायरस केल्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. यानंतर त्यांना स्पष्टीकरणही द्यावं लागलं. 'दक्षिण आफ्रिकन व्हेरियंट, ब्राझिल व्हेरियंट, भारतीय व्हेरियंट ही नावं वापरली जातात. एखाद्या गोष्टीची ज्या देशात निर्मिती झाली, त्याच्या नावाचा सामान्यपणे उल्लेख केला जातो,' असं हर्षा भोगले त्यांच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले.

कोरोना महामारीला एखाद्या देशाच्या नावाने जोडणं अनेकांना पटलं नाही. एखाद्या व्हायरसची कोणतंही राष्ट्रीयत्व नसतं, अशा कमेंटही काहींनी केल्या. तर एकाने ब्रिटनमधल्या या व्हायरसच्या स्ट्रेनला इंडियन व्हेरियंट म्हणलं जायचं, पण नंतर याचं नाव बदलून डेल्टा करण्यात आलं, असंही हर्षा भोगलेंना सांगितलं.

इंग्लंडच्या टीममधल्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजसाठी (England vs Pakistan) संपूर्ण टीम बदलावी लागली. पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजसाठी बेन स्टोक्सला (Ben Stokes) कर्णधारपद देण्यात आलं आहे, तर 9 जणांची पहिल्यांदाच इंग्लंड टीममध्ये निवड झाली आहे. 8 जुलैपासून इंग्लंड-पाकिस्तान यांच्यातल्या वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे.

वनडे सीरिजसाठी इंग्लंडची टीम

बेन स्टोक्स (कर्णधार), जॅक बेल, डेनी ब्रिग्स, ब्रायडन कार्स, जॅक क्रॉले, बेन डकेट, लुईस जॉर्ज, टॉम हेल्म, विल जॅक्स, डॅन लॉरेन्स, डेविड मलान, साकिब महमूद, क्रेग ओवर्टन, मॅट पार्किनसन, डेविड पेन, फिल सॉल्ट, जॉन सिम्पसन, जेम्स विन्सी

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Cricket, England