मुंबई, 29 डिसेंबर : आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शममध्ये काही खेळाडुंना कोट्यवधींची किंमत मिळाली. यातच 13.25 कोटी रुपये बोली लागलेला खेळाडू चेन्नईच्या फ्रँचाइजीकडून खेळू शकणार नाही. कोट्यवधींची बोली लागलेला हा खेळाडू चेन्नई सुपर किंग्जच्या फ्रँचाइजीकडून टी२० लीगमध्ये खेळणार नाही. हॅरी ब्रूकला आयपीएल ऑक्शनमध्ये सनरायजर्स हैदराबादने 13.25 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. मात्र तो नव्या वर्षात होणाऱ्या दक्षिण आफ्रिका टी२० लीगमध्ये खेळणार नाही. तो चेन्नईची फ्रँचाइजी असलेल्या जोहान्सबर्ग सुपरकिंग्जकडून खेळणार होता. पण तो संपूर्ण लीगला मुकणार आहे. साउथ आफ्रिका लीगमध्ये न खेळण्याचा निर्णय हॅरी ब्रूकचा नाही. तर त्याला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने लीगमध्ये खेळण्यास परवानगी द्यायला नकार दिला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तीनही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूने स्वत:ची काळजीच घ्यावी असं म्हटलं आहे. त्याने वर्कलोड मॅनेजमेंट करणे गरजेचे असून यामुळेच हॅरी ब्रूक साउथ आफ्रिका टी20 लीगमध्ये खेळणार नाही. हेही वाचा : पृथ्वी शॉ निवड समितीवर नाराज, संघ जाहीर होताच DP केला रिमूव्ह अन्…. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जोहान्सबर्ग सुपरकिंग्ज मॅनेजमेंटला बुधवारी कॉल करून सांगितलं की, “हॅरी ब्रूकचं वर्कलोड मॅनेजमेंट करायचे आहे. त्यामुळे तो साउथ आफ्रिका20 लीगमध्ये खेळणार नाही.” सीईओ काशी विश्वनाथ यांनी सांगितलं की, “ब्रूक तीनही फॉरमॅटमध्ये खेळतो. त्यामुळे ईसीबीला वाटतं की त्याला साउथ आफ्रिका टी20 लीगमध्ये खेळण्यास परवानगी देणं एक धोका आहे. आम्हाला रात्री उशिरा ईसीबीने हे सांगितलं. आम्ही त्याची रिप्लेसमेंट म्हणून खेळाडू शोधू.” हॅरी ब्रूकला सुपरकिंग्जने 2.10 मिलियन रँड म्हणजे जवळपास एक कोटी रुपये इतक्या किंमतीत खरेदी केलं होतं. आयपीएल ऑक्शनमध्ये पहिल्यांदाच उतरलेल्या हॅरी ब्रूकसाठी मोठी बोली लावली गेली. सनरायजर्स हैदराबादने 13.25 कोटी रुपयांची बोली लावून त्याला संघात घेतलं. हॅरी ब्रूक आघाडीच्या फळीत खेळणारा असून फिनिशरची भूमिकासुद्धा पार पाडू शकतो. नुकतंच पाकिस्तानमध्ये त्याने फलंदाजीत कमाल केली होती. त्याने सलग तीन कसोटी शकते झळकावली. या दौऱ्यात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याला प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कारही मिळाला. हेही वाचा : वर्षाअखेरीस टीम इंडियाला गूड न्यूज, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा असा फायदा ब्रूकने 3 सामन्यात 93 पेक्षा जास्त सरासरीने 468 धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे यात त्याचा स्ट्राइक रेटसुद्धा 93 पेक्षा जास्त होता. इंग्लंडकडून तो तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये खेळतो. आतापर्यंत त्याने 17 टी20 सामन्यात फक्त एकच अर्धशतक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.