जाहिरात
मराठी बातम्या / स्पोर्ट्स / हार्दिक पांड्याचा निर्णय टीम इंडियाला महागात, लंकेनं वाजवला विजयाचा डंका

हार्दिक पांड्याचा निर्णय टीम इंडियाला महागात, लंकेनं वाजवला विजयाचा डंका

हार्दिक पांड्याचा निर्णय टीम इंडियाला महागात, लंकेनं वाजवला विजयाचा डंका

दुसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेने भारताचा 16 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने आश्चर्यचकीत करणारे निर्णय घेतले.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    पुणे, 05 जानेवारी : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेने भारताचा 16 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताचा कर्णधार हार्दिक पांड्याने आश्चर्यचकीत करणारे निर्णय घेतले. गेल्या सामन्याच्या अनुभवावरून त्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र भारताला याचा फटका बसला. भारतीय गोलंदाजांनी एक दोन नव्हे तर तब्बल 7 नो बॉल टाकले. श्रीलंकेनं 20 षटकात 206 धावा काढल्या. यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना आघाडीची फळीही कोलमडली. दहा षटकात भारताची अवस्था 5 बाद 57 अशी होती. गोलंदाजीशिवाय टीम इंडियाच्या फलंदाजीतही अनेक चुका झाल्या. भारताचा चार फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाही. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या सूर्यकुमार आणि अक्षर पटेल यांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन केलं. अक्षर पटेलने वानिंदु हसरंगावर हल्लाबोल करत सलग तीन षटकार मारले. त्याने फक्त 20 चेंडूत अर्धशतक केलं. तर सूर्यकुमार यादवनेही दुसऱ्या बाजूने फटकेबाजी केली. दोघांमध्ये वेगवान अशी भागिदारी झाली.

    News18लोकमत
    News18लोकमत

    हेही वाचा :  BBLमध्ये धावांचा पाऊस, होबार्ट हरिकेन्ससाठी पाकिस्तानचा खेळाडू ठरला खलनायक सूर्यकुमार बाद झाल्यानतंर भारतीय संघ दबावाखाली दिसला. अक्षर पटेलने फटकेबाजीचा प्रयत्न केला पण अखेरच्या षटकात श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने स्वत:च चेंडू हातात घेतला. वानिंदु हसरंगाचं एक षटक शिल्लक होतं पण अक्षर पटेलने आधी त्याच्याच गोलंदाजीवर हल्ला चढवल्याने शनाकाने अखेरचं षटक टाकलं. यात त्याने दोन फलंदाजांना बाद केलं आणि सामना जिंकला.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात